AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCP Meeting: सत्तेत असूनही कामं होत नाहीत; राष्ट्रवादीच्या आमदारांची एकनाथ शिंदेंबाबत नाराजी, बैठकीत खदखद बाहेर

NCP MLAs Question Eknath Shinde Role: राष्ट्रवादीच्या आमदारांनी एकनाथ शिंदेंबाबत नाराजी व्यक्त केली आहे. देवगिरीवर बैठकीत खदखद बाहेर निघाली आहे.

NCP Meeting: सत्तेत असूनही कामं होत नाहीत; राष्ट्रवादीच्या आमदारांची एकनाथ शिंदेंबाबत नाराजी, बैठकीत खदखद बाहेर
NCP MLAs Question Eknath Shinde Role
| Updated on: Nov 03, 2026 | 10:11 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटात सुरू असलेल्या अंतर्गत कलहाच्या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्षा आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज आमदारांची बैठक बोलावली आहे. आमदारांची ही बैठक सायंकाळी 7 वाजता मुंबईतील सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी येथील शासकीय निवासस्थानी होत आहे. आमदारांची ही बैठक 4 महिन्यांनंतर होत आहे. या बैठकीबाबत आता मोठी बातमी समोर आली आहे. यापूर्वी सोमवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागील 2 तासांपासून देवगिरी निवासस्थानी बैठक सुरू आहे. बैठकीला 20 पेक्षा जास्त आमदार उपस्थित आहेत. बैठकीत आमदारांना येणाऱ्या अडचणी आणि त्यांच्या भावना व्यक्त करण्याची वरिष्ठ नेतृत्वाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. आमदारांकडून बैठकीत बोलताना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमधे सुरू असलेल्या संघर्षाबाबत विचारणा झाल्याचे समोर आले आहे.

सध्या वरिष्ठ नेत्यांमधे जे वाद सुरू आहेत त्याबाबत आमच्यापर्यंत काहीच कळत नाही, असं आमदारांचं म्हणणं आहे. वरिष्ठ नेत्यांमधे सुरू असलेल्या संघर्षाच्या बाबी सातत्याने समोर येत असल्यामुळे पक्ष कमजोर होतं आहे. आपला पक्ष सत्तेत असून देखील कामे होत नाहीत. एकनाथ शिंदे यांच्याकडून कामे होतं नसल्याची आमदारांनी तक्रार केली आहे. पक्षातील एका माजी मंत्र्यांकडून बोलताना अर्थमंत्री पदाबाबत नेमकं काय झालं आहे याबाबत विचारणा करण्यात आल्याचेही समजते आहे.

तर याआधी राष्ट्रवादी काँग्रेसची सोमवारी झालेली बैठक जवळपास दोन तास चालली. या बैठकीत पक्षाची संघटना आणि मंगळवारी होणाऱ्या बैठकीवर चर्चा झाली. यापूर्वी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली होती. तासभर चाललेल्या या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलहावरही चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्ष आजच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेऊ शकतो.

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटात सर्व काही आलबेल नाही. पक्षांतर्गत सुरू असलेली खळबळ आता समोर आली आहे. थेट पक्षश्रेष्ठी नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यामुळेच पक्षांतर्गत सुरू असलेली ही खळबळ संपवण्यासाठी पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी आज सर्व आमदारांची एक महत्त्वाची बैठक बोलावली. चार महिन्यांनंतर होणाऱ्या या बैठकीत पक्षांतर्गत गटबाजी, अर्थ मंत्रालय आणि नेतृत्व यावर आमदारांची मते जाणून घेतली गेली.

Follow Us
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित...
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित साटम यांना फटकारले