AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nita Ambani And Kareena Kapoor : करीना कपूरही झाली नीता अंबानींच्या 15 कोटींच्या ब्रोचची फॅन! असं काय आहे त्यात?

नीता अंबानी आणि करीना कपूर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत करीना नीता अंबानीच्या त्या दागिन्यावर भाळल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या संभाषणाचा व्हि़डिओ सगळीकडे व्हायरल होत आहे.

Nita Ambani And Kareena Kapoor :  करीना कपूरही झाली नीता अंबानींच्या 15 कोटींच्या ब्रोचची फॅन! असं काय आहे त्यात?
NEETA AMBANI KAREENA KAPOORImage Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 03, 2026 | 9:49 PM
Share

नीता अंबानी यांचा फॅशन आणि दागिन्यांचा शौक काही नवा नाही. त्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी झाल्या की त्यांच्या केसांपासून ते नखांपर्यंत प्रत्येक गोष्टीची चर्चा होते. यावेळी मात्रट त्यांच्या कपड्यांपेक्षा त्यांच्या एका छोट्याश्या ब्रोचने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. विशेष म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री करिनालाही त्याला हात लावण्याचा मोह आवरला नाही. दोघींच्या संवादाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये ‘द लायब्रर’ च्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 31 ऑक्टोबर रोजी झालेल्या या कार्यक्रमाला करीना कपूर, सैफ अली खान, शाहिद कपूर, मीरा जगताप, विक्रांत मेस्सी, काजोल, यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. यावेळी नीता अंबानी बेज रंगाच्या पँटसूटमध्ये दिसल्या. मात्र त्यांच्या कपड्यांवर लावलेल्या ड्रॅगनफ्लायच्या आकारच्या ब्रोचने सर्वांच लक्ष वेधून घेतलं.

करीनाची नजर ब्रोचवर खिळली

या कार्यक्रमातील एक व्हिडिओ ओरीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये करीना कपूर आणि नीता अंबानी एकमेकींशी गप्पा मारताना दिसतात. याचवेळी करीनाची नजर नीता अंबानी यांच्या कपड्यांवर लावलेल्या ब्रोचकडे जाते. ती तो जवळून पाहताना आणि हात लावून त्याची बनावट न्याहाळताना दिसते. नीता अंबानीही त्या ब्रोचबद्दल काहीतरी सांगताना दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Orhan Awatramani (@orry)

10 वर्षांत तयार झाला सोअरिंग स्पिरिट ब्रोच

या खास ब्रोचचं नाव सोअरिंग स्पिरिट आहे. प्रसिद्ध ज्वेलरी आर्टिस्ट वॉलेस चान यांनी त्याची रचना केली आहे. हा ब्रोच तयार करण्यासाठी त्याला तब्बल 10 वर्ष लागली असे सांगण्यात येत आहे. ड्रॅगनप्लाय म्हणजेच चतुर कीटकाचा तो ब्रोच आहे.

नीता अंबानीच्या त्या ब्रोचकडे महागडे रत्न

या ब्रोचमध्ये 17.67 कॅरेटचा त्सावोराईट गार्नेट, पिवळे हिरे, इतर रंगाचे हिरे, रूबी, गुलाबी निलम आणि टायटेनियमचा वापर करण्यात आला आहे. त्याची आणखी एक खासियत म्हणजे त्याचे शरीर टायटेनियमपासून तयार करण्यात आले आहे. त्यामुळे ते लवचिक असून हालचालींसोबत त्याचे पंखही हलतात.

किती आहे या ब्रोचची किंमत?

या ब्रोचची किंमत 15 ते 18 डॉलर असल्याचं सांगितलं जात आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम साधारण 12 ते 15 कोटी रूपयांच्या आसपास आहे.

Follow Us
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित...
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित साटम यांना फटकारले