AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ती मला नखांनी ओरखडाची आणि… सैफ अलीने सांगितला करीनासोबतचा तो किस्सा

कौन बनेगा करोडपतीमध्ये सैफ अली खानने पत्नी करीना कपूरसोबतचा एक मजेशीर किस्सा सांगितला. सुरुवातीला करीनाला बाईक राईड आवडत नसतानाही ती केवळ सैफसोबत वेळ घालवण्यासाठी त्याच्यासोबत आली होती. तिच्या नखांनी ओरखडल्याच्या या प्रसंगातून सैफला तिच्या प्रेमाची खरी जाणीव झाली. हा किस्सा त्यांच्या लव्हस्टोरीचा एक अविस्मरणीय भाग आहे.

ती मला नखांनी ओरखडाची आणि... सैफ अलीने सांगितला करीनासोबतचा तो किस्सा
Saif Ali KhanImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 03, 2026 | 9:39 PM
Share

कौन बनेगा करोडपतीमध्ये अभिनेता अक्षय कुमार आणि सैफ अली खान हैवान या सिनेमाचं प्रमोशनसाठी आले होते. सप्टेंबर महिन्यातील हा एपिसोड आहे. या एपिसोडमध्ये सैफ अली खानने त्याची पत्नी करीना कपूरसोबतचे किस्से शेअर केले आहेत. यात बाइक राइडचाही किस्सा आहे. केबीसीने नवीन प्रोमो व्हिडीओ रिलीज केला आहे. त्यात हा किस्सा ऐकायला मिळतोय. यावेळी सैफ आणि अक्षय या सिनेमावरही भरभरून बोलताना दिसत आहेत.

सैफ अली खानने पहिल्यांदाच करीनाला बाइक रायडरसाठी नेले होते. तेव्हाचा किस्सा ऐकवला आहे. आम्ही पहिल्यांदाच बाइक रायडरला गेलो होतो. काही मिनिटातच करीना किंचाळायला लागली. तिने माझ्या शरीरात तिची नखं घुसवली. मला ओरखडे काढू लागली. त्यानंतर हळूहळू माझ्या लक्षात आलं की करीनाला बाइक रायडिंग अजिबात आवडत नाही. केवळ प्रेम करत होती म्हणून ती माझ्यासोबत बाइक रायडरसाठी आली होती. माझ्यासोबत तिला वेळ घालवायचा होता, असं सैफ अलीने सांगितलं.

अन् एक बाइक घेतली…

यावेळी सैफ अली खानने करीना सोबतचा सिनेमाचा एक किस्साही शेअर केला. सुरुवाती सुरुवातीला जेव्हा करीना आणि मी अधिक बोलत नव्हतो. आम्ही एक दुसऱ्यांसोबत अत्यंत शालीन कलाकारांसारखे वागत होतो. त्यावेळी कुणी तरी मला म्हणालं की तू करीनाला बाइक राइडबाबत का विचारत नाही? तिला मोटारसायकल खूप आवडते. त्यावेळी मी एक बाइक घेतली. तेव्हा मी लडाखच्या रस्त्यावरून कानात हेडफोन्स लावून शुटिंगला यायचो, असं सैफ म्हणाला.

ती झटक्यात म्हणाली…

मी करीनाला बाइक राइडला येणार का म्हणून विचारलं. ती म्हणाली, का नाही? मला बाइक्स आवडतात. त्यानंतर आम्ही निघालो आणि काही सेकंदातच… कदाचित तुम्ही (अक्षय कुमार) शुटिंगवेळी हे फिल केले असेल. ती प्रत्येक मिनिटाला तिची नखं माझ्या शरीरात घुसवायची. थांबा… थांबा… थांबा… म्हणून किंचाळायची. मी बाइक थांबवायचो आणि परत सुरू करायचो. हे अनेकदा झालं. जेव्हा ती वारंवार नखांनी ओरखडे काढू लागली, ओरडू लागली तेव्हा तिने तिला बाइक राइड्स आवडत नसल्याचं सांगितलं, असंही त्याने सांगितलं.

नंतर खरं कारण समजलं…

तिला बाइक राइडस आवडत नाही हे ऐकल्यावर मला आश्चर्य वाटलं. मग आपण या बाइक सोबत काय करतोय? असं मी तिला विचारलं. पण, तिला माझ्यासोबत वेळ घालवायचा होता हे माझ्या लक्षात आलं. त्यामुळेच ती माझ्यासोबत राइडला आली होती. तिला राइड आवडत नसताना आली होती, असं तो म्हणाला. सैफ अली खान आणि करीनाचं लव्ह मॅरेज आहे. दोघांनी एकमेकांना बरीच वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केलं. त्यांची लव्ह स्टोरी सोशल मीडियावर चांगलीच गाजली होती.

Follow Us
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित...
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित साटम यांना फटकारले