AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाचू द्या की, तिने काय कीर्तनेच करावी का? इंदुरीकराची गुड्डी ट्रोल, तो व्हिडिओ व्हायरल होताच…

प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांची मुलगी ज्ञानेश्वरी (गुड्डी) हिचा ‘नाचू किती…’ गाण्यावरचा डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. तिच्या लग्नानंतर ही पुन्हा चर्चेत आली आहे. या व्हिडिओमुळे तिचे कौतुक होत असले तरी, काही जणांकडून तिला व इंदुरीकर महाराजांना ट्रोल केले जात आहे. सार्वजनिक जीवनातील भूमिकेमुळे निर्माण झालेल्या या चर्चेवर विविध प्रतिक्रिया येत आहेत.

नाचू द्या की, तिने काय कीर्तनेच करावी का? इंदुरीकराची गुड्डी ट्रोल, तो व्हिडिओ व्हायरल होताच...
dnyaneshwari indurikarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 03, 2026 | 8:53 PM
Share

प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर अधूनमधून चर्चेत असतात. मधल्या काळात त्यांची मुलगी गुड्डी ऊर्फ ज्ञानेश्वरीचं लग्न ठरलं होतं. मुलीचं लग्न ठरल्यापासून ते लग्न होईपर्यंत इंदुरीकर महाराज चांगलेच चर्चेत होते. इंदुरीकर प्रत्येक प्रवचनात लोकांना साध्या पद्धतीने लग्न करायला सांगायचे. लग्नाचा बडेजाव करणाऱ्यांवर जोरदार टीका करायचे. पण त्यांनीच मुलीचं लग्न एवढ्या थाटामाटात केलं की महाराज आयतेच ट्रोलर्सच्या हाती सापडले होते. प्रचंड ट्रोल झाल्याने त्यांनी नाराजीही व्यक्त केली होती. ज्ञानेश्वरीच्या लग्नाला आता पाच महिने झाले आहेत. तिचा सुखाचा संसार सुरू आहे. मात्र, पुन्हा एकदा ज्ञानेश्वरी चर्चेत आली आहे. ज्ञानेश्वरीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून ट्रोलर्सनी तिला भयंकर ट्रोल केलं आहे.

ज्ञानेश्वरी ऊर्फ गुड्डी हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ती “नाचू किती, नाचू किती, कंबर लचकली…” या गाण्यावर नाचताना दिसत आहे. तिच्यासोबत एक महिलाही नाचताना दिसत आहे. ज्ञानेश्वरीने या व्हिडीओत चांगलाच ठेका धरलेला दिसत आहे. हा व्हिडीओ येताच तो प्रचंड व्हायरल झाला असून त्यावर कमेंटचा पाऊस पडत आहे.

कोण काय म्हणालं अन् कोण काय म्हणालं?

गुड्डीचा हा व्हिडीओ येताच तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच तिला ट्रोलही केलं जात आहे. काहींना तिच्या व्यक्तीगत आयुष्याचं स्वागत केलं आहे. तर काहींना तिच्यावरून थेट इंदुरीकर महाराजांवर निशाणा साधला आहे. नाचू द्या की, तिचं लाइफ आहे. तिने काय तिच्या वडिलांसारखं कीर्तने सांगावी का? तरुण मुलगी आहे. नॉर्मल आहे. तिची आवड असेल, असं एकाने म्हटलं आहे. तर, अंगभर वस्त्र परिधान करून नाचते ती… स्वतःची आवड जपणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे, वडील कीर्तनकार असले म्हणजे तिने नाचणे चुकीच का..? नृत्य एक कला अन् छंद आहे. लोक जिथे नाही तिथं ज्ञान द्यायला सुरुवात करतात, असं दुसऱ्याने म्हटलं आहे. गावभर पेरलं, पण घरातच नाय उगवलं. लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडा पाषाण, अशी टीका एका व्यक्तीने केली आहे. तर, महाराजांनी आधी स्वतःच्या घरात लक्ष द्यावे. मग बाकी मुलींवर टीका कराव्यात, असं म्हटलं आहे.

थाटात विवाह सोहळा

ज्ञानेश्वरी हिचा विवाह 3 मे 2026 रोजी साहिल चिलप यांच्याशी झाला. साहिल हे प्रसिद्ध उद्योजक सुनील चिलप यांचे चिरंजीव आहेत. ज्ञानेश्वरीने एमसी डीसीसीएसपर्यंत शिक्षण घेतलं आहे. दोघांचा विवाह अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील गुंजावाडी शिवारात मोठ्या थाटात पार पडला होता.

Follow Us
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित...
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित साटम यांना फटकारले