इंदुरीकर महाराज
महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकारांपैकी एक म्हणून इंदुरीकर महाराज ओळखले जातात. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या कीर्तनाला तुफान गर्दी होताना दिसते. इंदुरीकर महाराज यांचं मूळ नाव निवृत्ती काशिनाथ देशमुख आहे. ते निवृत्ती महाराज आणि इंदुरीकर महाराज म्हणूनही लोकप्रिय आहेत. राज्यातील विनोदी कीर्तनकार म्हणून त्यांची ख्याती आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ते कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करतान दिसतात. त्यांच्या कीर्तनाचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतात.
Read MoreIndurikar Maharaj : इंदोरीकर महाराजांच्या लेकीची पहिली मंगळागौर थाटात; नऊवारीतील ज्ञानेश्वरीच्या पारंपरिक लूकने वेधलं लक्ष
कीर्तनकार इंदोरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरीची नुकतीच मंगळागौर झाली. तिच्या लग्नानंतरचा हा पहिला मंगळागौर सोहळा कौतुकाचा विषय ठरला. पती साहिल चिलप यांच्यासह तिचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
- manasi mande
- Updated on: Aug 29, 2026
- 4:06 pm
Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराज यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंग कोणता ? वाचून डोळ्यात येईल पाणी –
इंदुरीकर महाराज हे महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार व समाजप्रबोधक आहेत. विनोदी शैलीतून ते व्यसनाधीनता, अंधश्रद्धा यांसारख्या सामाजिक प्रश्नांवर प्रभावीपणे भाष्य करतात. कीर्तनाला साधना मानत, ते गेली चार दशके समाजजागृती करत आहेत आणि मातृ-पितृ कृतज्ञता सोहळाही आयोजित करतात.
- manasi mande
- Updated on: Aug 3, 2026
- 11:53 am
Indurikar Maharaj : 60 टक्के लोकांची जिंदगी मित्रांमुळे बरबाद.. इंदोरीकर महाराज काय बोलून गेले ?
प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचा मित्रांवरील एक नवीन व्हिडीओ सध्या खूप गाजत आहे. ते म्हणतात की, "ज्याचे मित्र चांगले, त्याचा संसार चांगला, ज्याचे मित्र खराब, त्याचा संसार खराब." कीर्तनात त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, "60 टक्के लोकांची जिंदगी मित्रांमुळे बरबाद झाली आहे." मित्रसंगतीमुळे आयुष्यावर होणाऱ्या परिणामांवर इंदुरीकर महाराजांनी प्रकाश टाकला आहे, ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
- manasi mande
- Updated on: Jun 8, 2026
- 2:06 pm
Indurikar Maharaj : चेहऱ्यावर हास्य आणि कुटुंबाची साथ.. इंदोरीकर महाराजांच्या जावयाचा वाढदिवस थाटात साजरा, Photo समोर
विख्यात कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या मुलगी ज्ञानेश्वरी आणि जावई साहिल चिलप यांच्या लग्नानंतरच्या घडामोडींची चर्चा सुरू आहे. नुकतेच थाटामाटात लग्न पार पडले, त्यानंतर जेजुरी दर्शन, धोंडे जेवण आणि जावई साहिलचा वाढदिवस साजरा झाला. साहिल हे प्रसिद्ध उद्योजक कुटुंबातून असून, दोघांचेही शिक्षण पूर्ण झाले आहे.
- manasi mande
- Updated on: Jun 3, 2026
- 2:55 pm
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग, पोलिसांनी सापळा रचला अन्…त्या अटकेचा थरार पहाच!
कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा विवाह सोहळा 3 मे रोजी संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. या विवाह सोळ्याच्या भव्यतेच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगत होत्या. महत्त्वाची बाब म्हणजे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक राजकीय नेत्यांसह राज्यभरातून आलेल्या हजारो लोकांनी या विवाह सोहळ्यास उपस्थिती लावली. मात्र यावेळी एक मोठी घटना घडली.
- प्रिती वेद
- Updated on: May 7, 2026
- 6:07 pm
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या लग्नात हे काय घडलं? वऱ्हाडी थेट पोलीस ठाण्यात; प्रकरण काय?
या विवाह सोहळ्याला मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परंतु गर्दीचा फायदा उचलत चोरट्यांनी विवाह सोहळ्यात हात साफ केला. चोरांनी अनेकांचे दागिने चोरले. पोलिसांनी या चोरांविरोधात आता मोठी कारवाई केली आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: May 7, 2026
- 4:34 pm
Indurikar Maharaj Daughter : यळकोट यळकोट जय मल्हार ! इंदोरीकर महाराजांच्या लेक-जावयाचं जेजुरी दर्शन! Photo समोर
प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या कन्या ज्ञानेश्वरी हिचा विवाह अहिल्यानगरमध्ये साहिल चिलप यांच्याशी थाटामाटात पार पडला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. लग्नानंतर नवदाम्पत्याने जेजुरी येथे देवदर्शन करत भंडाऱ्याची उधळण केली. या विवाह सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
- manasi mande
- Updated on: May 7, 2026
- 3:42 pm
Indurikar Maharaj : अबबब… भंगार भूंगार नाहीच… बंगला म्हणजे बंगलाच… इंदोरीकरांचा टोलेजंग बंगला पाहून डोळेच दिपतील, Exclusive Photos पाहिले का?
महाराष्ट्राचे प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज हे उच्चशिक्षित असून त्यांनी कीर्तन क्षेत्राला वेगळी ओळख दिली. त्यांची नर्म विनोदी शैली समाजाला प्रबोधित करते. त्यांच्या आलिशान घराची, पुरस्कार भिंतीची, सुंदर देवघराची आणि आधुनिक जीवनशैलीची खास झलक पाहू.
- manasi mande
- Updated on: May 7, 2026
- 1:48 pm
Indurikar Maharaj : इंदोरीकर महाराजांचा मुलगा काय करतो?, किती झालंय कृष्णाचं शिक्षण ?
इंदुरीकर महाराजांच्या कन्या ज्ञानेश्वरीचा थाटामाटात विवाह झाला. या सोहळ्यात त्यांचा मुलगा कृष्णा इंदुरीकर याच्याही भविष्याची चर्चा झाली. कृष्णा भगवानगडावरील विद्यापीठात वारकरी शिक्षण घेत असून, नामदेव शास्त्रींनी त्याचे कौतुक केले.
- manasi mande
- Updated on: May 6, 2026
- 10:13 pm
Indurikar Maharaj : इंदोरीकर महाराजांचे गुरूही उच्च विद्याविभूषित, पहिल्यांदाच आले समोर, लग्नात येताच इंदोरीकरांनी ठेवलं पायावर डोकं, कोण आहेत गुरू?
Indurikar Maharaj Guru : इंदोरीकर महाराजांच्या मुलीचं लग्न नुकतंच पार पडलं. या लग्नसोहळ्यात अनेक दिग्गज, राजकारणी, मोठी मंडळी आली होती. त्याचप्रमाणेच इंदोरीकर महाराजांचे गुरूही आले होते. त्यांनी गुरूंच्या पायावर डोके ठेवून त्यांचे आशीर्वाद घेतले, शाल , श्रीफळ देऊन त्यांचा सत्कारही केला.
- manasi mande
- Updated on: May 6, 2026
- 1:34 pm
Indurikar Maharaj : इंदोरीकर महाराजांची मुलगी ज्ञानेश्वरी आणि साहिल यांचं कसं ठरलं लग्न ?
इंदोरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरीचे साहिल चिलपसोबत अहिल्यानगरात थाटामाटात लग्न झाले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेकांची उपस्थिती होती. ज्ञानेश्वरीने MC DCCS, तर साहिलने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. महाराजांनी स्वतः पाहुण्यांची व्यवस्था पाहिली. अहिल्यानगरात झालेल्या या लग्नाला, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यापासून अनेक राजकारण्यांसह लाखो लोकांनी हजेरी लावली.
- manasi mande
- Updated on: May 5, 2026
- 12:44 pm
साखरपुड्यावरून एवढी टिका झाली, मग मुलीच्या लग्नात पैशांची एवढी उधळपट्टी का? इंदोरीकर महाराजांचं एका वाक्यात उत्तर
प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा विवाहसोहळा रविवारी मोठ्या थाटात पार पडला. मात्र या लग्नामुळे इंदोरीकर महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. खर्चावरून पुन्हा एकदा त्यांना ट्रोल केलं जात आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: May 4, 2026
- 9:54 pm