AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indurikar Maharaj : इंदोरीकर महाराजांच्या लेकीची पहिली मंगळागौर थाटात; नऊवारीतील ज्ञानेश्वरीच्या पारंपरिक लूकने वेधलं लक्ष

कीर्तनकार इंदोरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरीची नुकतीच मंगळागौर झाली. तिच्या लग्नानंतरचा हा पहिला मंगळागौर सोहळा कौतुकाचा विषय ठरला. पती साहिल चिलप यांच्यासह तिचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Indurikar Maharaj :  इंदोरीकर महाराजांच्या लेकीची पहिली मंगळागौर थाटात; नऊवारीतील  ज्ञानेश्वरीच्या पारंपरिक लूकने वेधलं लक्ष
Indurikar Maharaj Daughter Image Credit source: social media
| Updated on: Aug 29, 2026 | 4:06 PM
Share

अख्खा महाराष्ट्रात ज्यांचं कीर्तन गाजतं, गावा-गावांत ज्यांचं नाव मुखी असतं असे विख्यात कीर्तनकार म्हणजे इंदोरीकर महाराज ( Indurikar Maharaj ). महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकारांपैकी एक असलेल्या इंदोरीकर महाराजांचं मूळ नाव निवृत्ती काशिनाथ देशमुख. . गेल्या काही महिन्यांपासून इंदोरीकर महाराज त्यांच्या लेकीच्या लग्नामुळेही चर्चेत होते. त्यांच्या मुलीचा विवाह मे महिन्यात मोठ्या थाटामाटात पार पडला. अहिल्यानगरमध्ये झालेल्या या विवाहसोहळ्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक राजकीय नेते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या भव्य सोहळ्याचं अनेकांनी कौतुक केलं, तर काहींनी त्यावर टीकाही केली.

इंदोरीकर महाराज आणि त्यांचं कुटुंब कायमच चर्चेत असतं. त्यांच्या कुटुंबातील सदस्य कोण, मुलगी आणि मुलाचं शिक्षण किती, जावई काय करतात, इंदोरीकर महाराजांचं शिक्षण किती झालं, अशा अनेक गोष्टी जाणून घेण्याची लोकांना उत्सुकता असते.

इंदोरीकर महाराजांच्या लेकीची थाटात झाली मंगळागौर

इंदोरीकर महाराजांची मुलगी ज्ञानेश्वरी आणि साहिल चिलप यांचा विवाह गेल्या काही काळात चांगलाच चर्चेत राहिला. लग्नानंतर हे नवदाम्पत्य जेजुरीला दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते. त्यानंतर अधिक महिन्यानिमित्त इंदोरीकर कुटुंबीयांनी लेक ज्ञानेश्वरी आणि जावई साहिल यांना घरी बोलावून त्यांचा मानपान केला. त्यांच्यासाठी धोंड्याचं जेवणही आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

आता श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये मंगळागौरीचं आयोजन केलं जात आहे. विशेषतः नवविवाहित महिलांसाठी मंगळागौरीची पूजा आणि त्यानिमित्त होणारे पारंपरिक खेळ यांना विशेष महत्त्व असतं. इंदोरीकर महाराजांची लेक ज्ञानेश्वरी हिचीही नुकतीच मंगळागौर पार पडली. यावेळीचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत.

मंगळागौरीनिमित्त नऊवारी साडीत सजली ज्ञानेश्वरी

मंगळागौरीच्या निमित्ताने ज्ञानेश्वरीने खास पारंपरिक अंदाजात नटून-थटून हजेरी लावली. गर्द निळ्या रंगाची नऊवारी साडी, त्यावर मॅचिंग ब्लाऊज, हातभर काढलेली मेहंदी, हिरवा चुडा आणि गळ्यात-कानात शोभून दिसणारे दागिने असा तिचा पारंपरिक लूक होता. त्यासोबतच मंगळसूत्र, नथ आणि चेहऱ्यावरचं खुललेलं हास्य यामुळे तिचं सौंदर्य आणखी खुलून दिसत होतं. दुसरीकडे तिचे पती साहिल यांनीही पांढऱ्या शुभ्र रंगाचा कुर्ता परिधान केला होता. पारंपरिक वेशभूषेतील दोघांची जोडी खूपच खुलून दिसत होती.

ज्ञानेश्वरीने मंगळागौरीची विधिवत पूजा केली. या सोहळ्यानिमित्त कुटुंबीय आणि नातेवाईकांसह अनेक पाहुणेही उपस्थित होते. पूजेनंतर पारंपरिक मंगळागौरीचे खेळ रंगले. ज्ञानेश्वरीनेही या खेळांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. तिचा याच कार्यक्रमातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आला असून, तिचं कौतुक होत आहे.

काय करतो इंदोरीकर महाराजांचा जावई ?

इंदोरीकर महाराजांचे जावई साहिल चिलप हे मूळचे नवी मुंबईचे असल्याचं सांगितलं जातं. त्यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण गेल्या वर्षी पूर्ण केलं आहे. तर इंदोरीकर महाराजांची लाडकी लेक ज्ञानेश्वरी हिनेही एमसी डीसीएसचं शिक्षण पूर्ण केलं आहे. गेल्या वर्षी दोघेही शिक्षण घेत असतानाच त्यांच्या कुटुंबीयांनी लग्नाचा निर्णय घेतला. साहिल आणि ज्ञानेश्वरी हे दोघेही आपल्या आई-वडिलांच्या शब्दाबाहेर नसल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे लग्नाचा प्रस्ताव आल्यानंतर दोघांनीही या विवाहाला संमती दिली. त्यानंतर मे महिन्यात दोघांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला.

Follow Us
सोलापूरमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांना अडवले
माढ्यात शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांसमोर २ लाखांच्या कर्जमाफीची मागणी
चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लुक समोर; पहा...
Chinchpoklicha Chintamani | चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लुक समोर; पहा व्हिडीओ
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! चिंपोकळीतील चिंतामणीचं भव्य स्वागत
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! चिंपोकळीतील चिंतामणीच्या भव्य स्वागताचा व्हिडीओ समोर
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या, गुणरत्न सदावर्तेंचा आरोप
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या आणि पूर्ण होऊ शकत नाहीत- गुणरत्न सदावर्ते
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांचे समर्थन
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांचे समर्थन
अशोक उईके: आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने मागे, प्रमुख मागण्या मान्य
अशोक उईके: आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने मागे, प्रमुख मागण्या मान्य; तीन महिन्यांनी पुन्हा चर्चा
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स...
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स मीडिया ग्रुप आमनेसामने
राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
Rahul Gandhi | राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, केलं आवाहान...
Manoj Jarange Patil : अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, प्रत्येक मराठ्याला केलं आवाहन