AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hyundai Bayon ची डिलिव्हरी सुरू, समोर आला कारचा पहिला व्हिडीओ, किंमत किती?

Hyundai Bayon ची पहिली डिलिव्हरी सुरू. टॉप HX10 व्हेरिएंट घेण्यासाठी कुटुंबाची डीलरशिपमध्ये गर्दी. किंमत आणि फीचर्स पाहून व्हाल थक्क.

Hyundai Bayon ची डिलिव्हरी सुरू, समोर आला कारचा पहिला व्हिडीओ, किंमत किती?
| Updated on: Nov 03, 2026 | 8:52 PM
Share

Hyundai मोटर इंडियाची नवीन SUV Hyundai Bayon सध्या ऑटोमोबाईल बाजारात चर्चेचा विषय ठरत आहे. कंपनीने 26 ऑक्टोबर 2026 रोजी भारतीय बाजारात ही नवीन SUV लाँच केली होती. आता या गाडीच्या डिलिव्हरीलाही सुरुवात झाली असून, पहिल्या डिलिव्हरीचा व्हिडिओ समोर आला आहे. विशेष म्हणजे, ही SUV कंपनीच्या Venue आणि Creta या दोन लोकप्रिय मॉडेल्सच्या मधल्या श्रेणीत ठेवण्यात आली आहे.

भोपाळमध्ये Hyundai Bayon ची पहिली डिलिव्हरी

Hyundai Bayon च्या पहिल्या डिलिव्हरीचा व्हिडिओ यूट्यूबवर कुलदीप भारले यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भोपाळ येथील सुरजीत Hyundai डीलरशिपमधून एक कुटुंब नवीन Bayon SUV घेऊन बाहेर पडताना दिसत आहे. गाडीला फुलांची माळ घालून सजवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या कुटुंबाने Bayon चा टॉप HX10 व्हेरिएंट खरेदी केल्याचे व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे. ही गाडी क्लासी ब्लू रंगात आहे.

आकर्षक डिझाइन आणि दमदार लूक

Hyundai Bayon ला कंपनीच्या नवीन ‘Art of Steel’ डिझाइनवर तयार करण्यात आले आहे. काही अँगलमधून ही SUV नवीन Hyundai Tucson च्या छोट्या आवृत्तीसारखी दिसते. या गाडीची लांबी 4.2 मीटर असून, ती Hyundai च्या ग्लोबल K प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. कंपनीच्या माहितीनुसार, हा प्लॅटफॉर्म भारत NCAP च्या 5-स्टार सुरक्षा मानकांचा विचार करून विकसित करण्यात आला आहे.

डिझाइनमध्ये H-Edge LED DRL, LED प्रोजेक्टर हेडलॅम्प, 17-इंच अलॉय व्हील्स, मोठे व्हील आर्च, बॉडी क्लॅडिंग, LED टेललॅम्प, ड्युअल-टोन रिअर बंपर आणि स्पॉयलर देण्यात आले आहेत.

इंजिन आणि मायलेज किती?

Hyundai Bayon मध्ये Creta प्रमाणे 1.5-लिटर नॅचरली अ‍ॅस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 115 bhp पॉवर आणि 144 Nm टॉर्क निर्माण करते. इंजिनसोबत 6-स्पीड मॅन्युअल आणि CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे पर्याय मिळतात.

कंपनीच्या दाव्यानुसार, CVT ऑटोमॅटिक व्हेरिएंटचे मायलेज 18.6 किमी प्रति लिटर आहे. सध्या या SUV मध्ये टर्बो पेट्रोल, डिझेल किंवा हायब्रीड इंजिनचा पर्याय उपलब्ध नाही. मात्र, पुढील वर्षाच्या सुरुवातीला कंपनी याचे CNG व्हेरिएंट सादर करू शकते.

Hyundai Bayon ची किंमत किती?

भारतीय बाजारात Hyundai Bayon ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 9.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. बेस व्हेरिएंट 9.99 लाखांपासून. टॉप HX10 मॅन्युअल 16.65 लाख. टॉप HX10 ऑटोमॅटिक 18 लाख रुपये.

Follow Us
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित...
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित साटम यांना फटकारले