विमान हवेत असतानाच छताला तडा… प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या विमानाची पुन्हा भयानक दुर्घटना
फुकेतहून दिल्लीला येणाऱ्या Air India च्या विमानाला हवेत अचानक तीव्र हेलकावे जाणवल्याची घटना ४ ऑगस्ट २०२६ रोजी घडली. AI-2379 या विमानाला प्रवासादरम्यान एअर टर्बुलेंसचा जोरदार अनुभव आला. त्यामुळे विमानातील काही प्रवासी आणि क्रू मेंबर्सना किरकोळ दुखापत झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, विमान हवेत असताना अचानक मोठ्या प्रमाणात हेलकावे जाणवू लागले. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. विमानाच्या आतील भागाचेही काही प्रमाणात नुकसान झाले असून छताला काही ठिकाणी हलके तडे गेल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात ठेवत विमानाने अखेर दिल्ली विमानतळावर सुखरूप लँडिंग केले. विमान उतरल्यानंतर किरकोळ दुखापत झालेल्या प्रवाशांना आणि क्रू मेंबर्सना तातडीने विमानतळावरील वैद्यकीय केंद्रात नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर आवश्यक उपचार करण्यात आले.
या घटनेमुळे विमान प्रवासादरम्यान एअर टर्बुलेंस किती अचानक आणि धोकादायक ठरू शकते, याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी जीवितहानी झाल्याचे समोर आलेले नाही.
Published on: Aug 04, 2026 04:02 PM
विमान हवेत असतानाच छताला तडा...प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या...
तर तुम्हाला गुंगी गुडिया म्हणणे योग्यच आहे!; सपकाळांचा सुनेत्रा...
ओमराजे, सचिन अहिर थेट लोकसभा अध्यक्षांच्या भेटीला; इतर खासदार...
भाजपने घाबरण्याची गरज नाही, ED-CBI तुमचीच!; अभिजीत दिपकेंचा थेट टोला