AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्वाची अपडेट, अर्जात चूक झाली तर……

Ladki Bahin Yojana : महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री यांनी 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. त्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. काय म्हणाल्या अदिती तटकरे ?

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्वाची अपडेट, अर्जात चूक झाली तर......
लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेटImage Credit source: social media
| Updated on: Jan 24, 2026 | 9:28 AM
Share

राज्यातील महिलांना स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभं राहता यावं यासाठी राज्य सरकारने साधारण दीड वर्षांपूर्वी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ (Ladki Bahin Yojana) योजनेची घोषणा केली. त्याअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. त्यांच्या खात्यात ही रक्कम दर महिन्यालाजमा होते. ही योजना सुरू झाल्यापासून नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असते. कधी पैसे, कधी ईकेवायसी तर कधी अजून काही… विरोधकांनी या योजनेवर बरीच टीकाही केली. मात्र राज्यातील कोट्यवधी महिलांना साधरण दीड वर्षांपासून दरमहा हक्काचे 1500 रुपये मिळत असून त्याचा महायुतीला विधानसभ निवडणुकीत मोठा फायदाही झाला.

या योजनेत अनेक गैरप्रकार होत असल्याचे उघडकीस आल्यावर त्याा आळा घालण्यालाठी ईकेवायसी करण्याचे निर्देश देण्यात आले. कोटयवधी महिलांनी हे अपडेशन केले. आता राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आणखी एक महत्वाची अपेडट समोर आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्वाची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी विशेष हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे. त्याव कॉल करून त्यांच्या कोणत्याही शंकांचं निरसन करण्यात येणार आहे. आवश्यकता असेल तर लाडक्या बहिणींनी या या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा, असं आदिती तटकरे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

लाडक्या बहिणींसाठी विशेष हेल्पलाइन नंबर

मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स (पूर्वीचं ट्विटर) वर एक पोस्ट लिहून लाडक्या बहिणींसाठी महत्वाचे अपडेट्स दिले आहेत. लाडक्या बहिणींसाठी विशेष हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आल्याचे जाहीर केले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी विशेष हेल्पलाइन नंबर

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची e-KYC प्रक्रिया करत असताना काही कारणास्तव चुकीचा पर्याय निवडल्याने लाभ स्थगित झाल्याच्या काही तक्रारी विभागास प्राप्त झाल्या आहेत. या व योजनेशी संबंधित इतरही तक्रारींचे, शंकांचे फोन कॉलवर निवारण करण्यासाठी 181 या महिला हेल्पलाइन नंबरवर मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबत संबंधित कॉल ऑपरेटर्सना योग्य ते प्रशिक्षणही देण्यात आले आहे. योजनेशी संबंधित सर्व तक्रारींचे व शंकांचे निरसन 181 या हेल्पलाईन नंबरवरून करण्यात येणार आहे.

तरी, सर्व लाडक्या बहिणींनी आवश्यकता भासल्यास या सुविधेचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती- असं त्यंनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

डिसेंबर, जानेवारीचा हप्ता अद्याप नाही

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येतात. मात्र त्यांना डिसेंबरा आणि जानेवारी 2026 या दोन महिन्यांचे पैसे, 3000 हजार रुपये अद्याप मिळाले नसल्याचं समोर आलं. यामुळे लाडक्या बहिणी आक्रमक झाल्याचंही पहायला मिळालं होतं. काही दिवसांपूर्वीच भंडारा, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, वाशिम जिल्ह्यात लाडक्या बहीणी रस्त्यावर उतरल्या होत्या.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.