Raj Thackeray | राज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक; काय ठरणार?
महापालिका निवडणुका झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. राज ठाकरे यांनी निवडणुकीनंतर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेण्याचा आणि चर्चा करण्याचा सपाटा लावला आहे. त्यातच पक्षाला 20 वर्ष पूर्ण झाल्याने मनसेने सदस्य नोंदणी मोहीम हाती घेतली आहे. राज ठाकरे यांनी राज्यातील जनतेला पक्षाचे सक्रिय सदस्य होण्याचं आवाहनही केलं आहे. एकंदरीत महाराष्ट्रात आपली ताकद वाढवण्यासाठी मनसेने कात टाकायला सुरुवात केली आहे.
महापालिका निवडणुका झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. राज ठाकरे यांनी निवडणुकीनंतर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेण्याचा आणि चर्चा करण्याचा सपाटा लावला आहे. त्यातच पक्षाला 20 वर्ष पूर्ण झाल्याने मनसेने सदस्य नोंदणी मोहीम हाती घेतली आहे. राज ठाकरे यांनी राज्यातील जनतेला पक्षाचे सक्रिय सदस्य होण्याचं आवाहनही केलं आहे. एकंदरीत महाराष्ट्रात आपली ताकद वाढवण्यासाठी मनसेने कात टाकायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज राज ठाकरे यांनी पक्षाच्या अंगीकृत संघटनांच्या नेत्यांसोबत तातडीची बैठक बोलावली आहे. ही बैठक शिवतीर्थ येथील त्यांच्या निवासस्थानी सुरु असून बैठकीला पक्षाचे पदाधिकारी उपस्थित आहे. या बैठकीत पक्षाचे अंतर्गत धोरण, आगामी उपक्रम आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. तसेच या बैठकीत काही ठोस अजेंडा ठरवला जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. राज ठाकरेंनी आज बोलावलेल्या या तातडीच्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असून चर्चांना उधाण आलं आहे.
Published on: Mar 11, 2026 01:11 PM
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये...
'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर CM
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू

