Mangal Gochar: नोव्हेंबरमध्ये मंगळ गोचराचा मोठा परिणाम! 3 राशींना बसू शकतो फटका, प्रत्येक पाऊल जपून टाका
Mars Transit: नोव्हेंबर महिन्यात मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन होणार असून त्याचा परिणाम सर्व राशींवर पाहायला मिळेल. ज्योतिषशास्त्रानुसार, या गोचरामुळे 3 राशींच्या अडचणी वाढू शकतात. त्यामुळे आर्थिक व्यवहार, नोकरी, आरोग्य आणि कौटुंबिक संबंधांच्या बाबतीत या राशींच्या लोकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

मंगळ ग्रहाला ज्योतिषशास्त्रात साहस, ऊर्जा, पराक्रम, जमीन आणि क्रोध यांचा कारक मानले जाते. मंगळाच्या राशी परिवर्तनाचा परिणाम व्यक्तीच्या करिअर, आर्थिक परिस्थिती आणि कौटुंबिक जीवनावरही होतो. १२ नोव्हेंबरला मंगळ कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. मंगळाच्या या गोचरामुळे काही राशींच्या आयुष्यात अडचणी आणि आव्हाने वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः कन्या, मकर आणि मीन राशीच्या लोकांना या काळात अधिक सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे.
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी मंगळाचे गोचर बाराव्या भावात होणार आहे. त्यामुळे खर्चात वाढ होण्याची शक्यता असून जमीन आणि मालमत्तेशी संबंधित व्यवहार करताना काळजी घ्यावी लागेल. वैवाहिक जीवनात मतभेद होऊ शकतात. नात्यांमध्ये तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप वाढू देऊ नका. तसेच वैयक्तिक गोष्टी प्रत्येकासोबत शेअर करणे टाळा. या काळात आर्थिक निर्णय घाईने घेऊ नका. दररोज हनुमान चालीसाचे पठण करा.
मकर
मकर राशीच्या लोकांसाठी मंगळाचे गोचर आठव्या भावात होणार आहे. या काळात वाहन चालवताना आणि आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्या. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत वाद घालणे टाळा. कार्यालयातील राजकारणापासून दूर राहणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. रागावर नियंत्रण ठेवा. छोट्या गोष्टींमुळे कुटुंबातही तणाव निर्माण होऊ शकतो. गूळ, गहू तसेच लाल वस्त्रांचे दान करणे शुभ मानले जाते.
मीन
मीन राशीच्या लोकांसाठी मंगळाचे गोचर सहाव्या भावात होणार आहे. कामाच्या ठिकाणी काही लोक अडथळे निर्माण करू शकतात, त्यामुळे आपल्या योजना प्रत्येकासोबत शेअर करू नका. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक मेहनत घ्यावी लागेल. चुकीच्या संगतीपासून दूर राहा. वेळेचा योग्य वापर करा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पोट किंवा हृदयाशी संबंधित त्रास जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. या काळात मंगळाच्या मंत्रांचा जप करणे शुभ मानले जाते.
(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)
