AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर 36 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरचा हार्टअटॅकने मृत्यू

आरोग्यदायी राहण्यासाठी धावण्याचे महत्व सांगणाऱ्या मॅरेथॉन शर्यतीतच एका ३६ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.

मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर 36 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरचा हार्टअटॅकने मृत्यू
Heart Attack
| Updated on: Nov 02, 2026 | 7:26 PM
Share

Hyderabad News: तेलंगणाच्या हैदराबाद येथे मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर एका 36 वर्षीय आयबीएम सॉफ्टवेअर इंजिनिअरचा नाश्ता करताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला आहे. मॅरेथान शर्यत पूर्ण केल्यानंतर पदक मिळाल्यानंतर काही वेळांनी त्यांना हृदय विकाराचा झटका आला. रविवारी सकाळी हैदराबादच्या गाचीबौली स्टेडियममध्ये घडलेल्या घटनेने त्यांच्या सोबत धावणारे हौशी धावपटू आणि आयोजकांना धक्का बसला आहे.

हैदराबाद येथे आरोग्यदायी राहण्यासाठी धावण्याचे महत्व सांगणाऱ्या मॅरेथॉन शर्यतीत भाग घेणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनियरचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर त्यांनी पदक घेतले आणि काही काळातच त्यांच्या छातीत कळ येऊन त्यांना हृदयविकाराचा मोठा झटका आला. रविवारी सकाळी हैदराबाद येथील गाचीबौली स्टेडियममध्ये घडलेल्या या दु:खद घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एनईबीच्या देखरेखीत रविवारी सकाळी गाचीबौली स्टेडियएममध्ये मॅरेथानचे आयोजन केले होते. मणिकोंडाची अलकापूर कॉलनीचे रहिवासी कोम्मिनेनी गोपी (36) यांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता. त्यांनी उत्साहपूर्वक मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला आणि निर्धारित वेळेत ही मॅरेथॉन धावण्याची शर्यत पूर्ण केली त्यानंतर त्यांना मेडल देखील देण्यात आहे.

नाश्ता करायला जाताना आला हार्ट अटॅक

शर्यत पूर्ण केल्यानंतर खूप आनंदी झालेले गोपी काही वेळाने अचानक अत्यवस्थ झाले. मॅरेथॉननंतर नाश्ता करायला जाताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. या घटनेनंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. मॅरेथॉनच्या आयोजकांनी गोपी यांना उपचारासाठी जवळच्या केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले.

कोम्मिनेनी गोपी हे आयटी कंपनी आयबीएममध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. त्यांनी त्यांच्या तब्येतीची संपूर्ण काळजी घेत मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता. ही एक दुखद घटना आहे. धावल्यानंतर पदक प्राप्त केल्यानंतर त्यांचा काही वेळातच हार्ट अटॅकने मृत्यू झाला. या घटनेने मॅरेथॉन परिसरात शोक लहर उमटली आहे.

Follow Us
राष्ट्रवादीत मोठी खदखद, शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची
NCP Leader Meet Amit Shah : राष्ट्रवादीत मोठी खदखद, अमित शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची तक्रार? पार्थ आणि सुनेत्रा पवारांच्या भूमिकेवर नाराजी
बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
Devendra Fadnavis : काँग्रेसने बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला....
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला लगावत नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस....
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस पूर्ण विश्रांतीचा सल्ला
तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाह...
Amit Shah : तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाहांचा निर्धार
सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवल
Sangali : सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवलं
दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत.....
Sanjay Ghadi On BJP : दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत मतभेद
दिया मिर्झाने हिंदूंना दिवाळी कशी साजरी करावी हे शिकवू नये...
Ritu Tawde on Dia Mirza : दिया मिर्झाने हिंदूंना दिवाळी कशी साजरी करावी हे शिकवू नये; दिया मिर्झाच्या त्या व्हिडीओवरून महापौर आक्रमक
माझ्याकडे सर्वांचा सातबारा आहे...; रवींद्र धंगेकरांचा रोख कोणाकडे?
Ravindra Dhangekar : माझ्याकडे सर्वांचा सातबारा आहे...; रवींद्र धंगेकरांचा रोख नेमका कोणाकडे?
गोकुळ अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा! कोर्टाचे आदेश काय? 25 संचालकांची...
गोकुळ अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा! कोर्टाचे आदेश काय? 25 संचालकांची महत्त्वपूर्ण सभा अन्...