AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : आयुष्यात कितीही संकट आली तरी असे लोक कधीच खचून जात नाहीत, चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात या समाजात असे देखील काही लोक असतात, ज्याच्यांवर कितीही संकट आली, तरी देखील ते खचून जात नाहीत, धीर सोडत नाहीत. असेच लोक शेवटी विजय प्राप्त करतात.

Chanakya Niti : आयुष्यात कितीही संकट आली तरी असे लोक कधीच खचून जात नाहीत, चाणक्य काय म्हणतात?
ChanakyaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 02, 2026 | 7:26 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील अनेकांना मार्गदर्शक ठरतात. आदर्श जीवन कसं जगावं, आयुष्यात काय करावं? आणि काय करू नये? याच थोडक्यात सार चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात समाजात दोन प्रकारचे लोक असतात, एक तर असे लोक असतात, जे थोड्याशा संकटाने देखील खचून जातात, आयुष्यात आता सगळं काही संपलं आहे, अशी त्यांची भावना होते, असे लोक आपल्या आयुष्यात फार काही करू शकत नाहीत. याउलट असे काही लोक असतात, जे संकटांमध्ये कधीच खचून जात नाहीत, मग ते संकट कितीही मोठं असू द्या, ते त्या संकटाचा धैर्याने सामना करतात. कारण अशा लोकांकडे काही विशिष्ट गुण असतात, आज आपण त्याबद्दलच माहिती जाणून घेणार आहोत, चला तर मग पाहूयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

संयम -चाणक्य म्हणतात संयम ही आयुष्यातील सर्वात मोठी गोष्टी असते, ज्या व्यक्तीकडे संयम आहे, असा व्यक्ती जग जिंकतो, परंतु ज्याकडे संयम नाही, असा व्यक्ती आपल्या आयुष्यात फार काही करू शकत नाही. ज्याच्याकडे संयम नाही तो व्यक्ती लवकर हार मानतो. परंतु ज्याच्याकडे संयम आहे, त्या व्यक्तीला हे चांगल्याप्रकारे माहीत असतं की ही वेळ देखील निघून जाणार आहे, त्यामुळे असा व्यक्ती संकटात कधीही खचत नाही, तो संयम ठेवतो आणि शेवटी एक दिवस तो विजयी होतो. संयमाच्या बळावर तो विजय प्राप्त करतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. त्यामुळे प्रत्येकाकडे संयम हवाच असा सल्ला आर्य चाणक्य देतात.

ज्ञान – चाणक्य म्हणतात जे लोक ज्ञानी असतात, असे लोक संकट काळात कधीच खचत नाहीत, कारण त्यांना देखील ही गोष्ट चांगली माहिती असते की वेळ बदलणार आहे, असे लोक एका चांगल्या संधीच्या शोधात असतात. असे लोक आपल्या ज्ञानाच्या जोरावर कोणत्याही संकटामधून बाहेर पडतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

निर्णय क्षमता – चाणक्य म्हणतात माणसाजवळ निर्णय क्षमता असली पाहिजे, जर तुमच्याकडे निर्णय क्षमता असेल, तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकत असाल तर आयुष्यात तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
राष्ट्रवादीत मोठी खदखद, शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची
NCP Leader Meet Amit Shah : राष्ट्रवादीत मोठी खदखद, अमित शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची तक्रार? पार्थ आणि सुनेत्रा पवारांच्या भूमिकेवर नाराजी
बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
Devendra Fadnavis : काँग्रेसने बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला....
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला लगावत नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस....
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस पूर्ण विश्रांतीचा सल्ला
तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाह...
Amit Shah : तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाहांचा निर्धार
सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवल
Sangali : सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवलं
दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत.....
Sanjay Ghadi On BJP : दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत मतभेद
दिया मिर्झाने हिंदूंना दिवाळी कशी साजरी करावी हे शिकवू नये...
Ritu Tawde on Dia Mirza : दिया मिर्झाने हिंदूंना दिवाळी कशी साजरी करावी हे शिकवू नये; दिया मिर्झाच्या त्या व्हिडीओवरून महापौर आक्रमक
माझ्याकडे सर्वांचा सातबारा आहे...; रवींद्र धंगेकरांचा रोख कोणाकडे?
Ravindra Dhangekar : माझ्याकडे सर्वांचा सातबारा आहे...; रवींद्र धंगेकरांचा रोख नेमका कोणाकडे?
गोकुळ अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा! कोर्टाचे आदेश काय? 25 संचालकांची...
गोकुळ अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा! कोर्टाचे आदेश काय? 25 संचालकांची महत्त्वपूर्ण सभा अन्...