AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चकलीचा साचा नाही? काही हरकत नाही! बिना साच्याशिवाय अशी बनवा गोल खमंग खुसखुशीत चकली

दिवाळीचा फराळ चकलीशिवाय पूर्ण होतच नाही. पण बऱ्याच जणींकडे साचा नसतो. तर काहींच्या चकल्या कुरकुरीत होतच नाही. पण आता काळजी नको. खालील दिलेल्या रेसिपीमुळे तुम्ही चकल्याच काय,वेगवेगळे पदार्थही घरबसल्या करू शकता. जाणून घ्या.

चकलीचा साचा नाही? काही हरकत नाही! बिना साच्याशिवाय अशी बनवा गोल खमंग खुसखुशीत चकली
chakli recipeImage Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 02, 2026 | 10:00 PM
Share

दिवाळीच्या फराळाचं ताट चकलीशिवाय काही पूर्ण होत नाही. पण चकली बनवायची म्हटली की आधी साचा शोधा, मग पीठ तयार करा आणि चकल्या पाडा… असा सगळा व्याप असतो. आता तुमच्याकडे चकलीचा साचा नसेल तरी काळजी करण्याची गरज नाही. कारण चकलीच्या साच्याशिवायही तुम्ही खुसखुशीत, कुरकुरीत आणि खमंग चकली बनवू शकता. कसं? चला सांगते

अहो चकली आणि बेसनाच्या मदतीने होय तुम्ही बरोबर वाचताय चकली आणि बेसनाच्या मदतीने तुम्ही खुसखुशीत चकली बनवू शकता ते ही घरच्याघरी. त्यात विशेष म्हणजे तुम्ही यापासून फक्त चकलीच नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे चहा सोबत खाता येणारे स्नॅक्स करू शकता.

चकली बनवण्यासाठी लागणारे साहित्य

2 वाट्या बेसन, 1 वाटी पोह्यांची पावडर, 1 मोठा चमचा रवा पावडर, 1 छोटा चमचा आलं लसणाचा रस, अर्धा चमचा काळी मिरचीची पावडर, 1 छोटा चमचा पापड खार, 1 छोटा चमचा घी, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, 1 छोटा चमचा पीठीसाखर, 2 छोटे चमचे गरम तेल, मीठ, 1 कप पाणी

सर्वात आधी एका मोठ्या भांड्यात बेसन,पोह्यांची पावडर आणि रव्याची पावडर एकत्र करा. त्यात आलं – लसूण रस, काळी मिरी पावडर,पापडखार , तूप आणि मीठ घाला. त्यानंतर लाल तिखट आणि पाणी घालून मिश्रण व्यवस्थित एकत्र करा. आता त्यात गरम तेल आणि पीठीसाखर घालून पुन्हा पीठ मळून घ्या. अशा प्रकारे चकलीसाठी पीठ तयार झाले.

एकाच पीठापासून बनवा चार वेगवेगळे पदार्थांचे आकार

रिंग चकली : पिठाचा छोटा गोळा घेऊन हाताने लांब वळा. त्याची दोन्ही टोक एकमेकांना जोडून गोल आकार तयार करा. जोड व्यवस्थित दाबून बंद करा

साधी चकली : थोडं पीठ हातात घेऊन त्याला गोल किंवा वळणदार आकार द्या. त्यावर काटया चमच्याने टोचे मारत टोचे वर करत डिझाईन द्या.

कुलकुल : काट्या चमच्याच्या मागील बाजूला थोडं तेल लावा. पिठाचा छोटा गोळा काट्यावर दाबून चपटा करा. त्यानंतर काट्याच्या टोकाकडून हळूहळू गुंडाळा. त्यामुळे पिठावर रेषा तयार होतील आणि कुलकुलसारखा आकार मिळेल.

आवडीचा आकार : उरलेल्या पिठापासून हाताने छोटे रोल तयार करून त्यांना वेगवेगळे आकार देऊ शकता.

चकल्या कुरकुरीत कशा तळायच्या?

कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर गॅस मध्यम आचेवर ठेवा. तयार केलेल्या चकल्या आणि कुलकुल थोड्या थोड्या प्रमाणात तेलात सोडा. त्या हलक्या सोनेरी रंगाच्या आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. तळलेल्या चकल्या पेपरवर काढा. म्हणजे एक्स्ट्राचे तेल निघून जाईल.

चकल्या पूर्णपणे थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा. अशा प्रकारे चकलीचा साचा नसतानाही घरच्या घरी वेगवेगळ्या आकाराचे कुरकुरीत स्नॅक्स तयार करता येतील.

Follow Us
दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना
Radhakrishna Vikhe-Patil : दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना मिळणार पाणी; विखे पाटलांनी सांगितलं संपूर्ण नियोजन
नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुली
Nanded : दादागिरी नाही चालणार! नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुलीविरोधात शेतकरी संघटना आक्रमक
सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
Sunetra Pawar Meeting : NCP : सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
राष्ट्रवादीत मोठी खदखद, शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची
NCP Leader Meet Amit Shah : राष्ट्रवादीत मोठी खदखद, अमित शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची तक्रार? पार्थ आणि सुनेत्रा पवारांच्या भूमिकेवर नाराजी
बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
Devendra Fadnavis : काँग्रेसने बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला....
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला लगावत नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस....
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस पूर्ण विश्रांतीचा सल्ला
तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाह...
Amit Shah : तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाहांचा निर्धार
सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवल
Sangali : सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवलं
दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत.....
Sanjay Ghadi On BJP : दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत मतभेद