Video : ऑन – कॉल पंक्चर सर्विस! बाईकला बनवून टाकलं चालतं फिरतं दुकान
भर रस्त्यात कोणतेही वाहन बिघडलं तर पंक्चर सेंटरपर्यंत नेण्यासाठी त्याला ढकलत न्यावं लागतं. त्यावर उपाय म्हणून एका तरूणाने भन्नाट उपाय शोधून काढला आहे. त्याची ही आयडिया आणि त्याचा व्हिडिओ एका व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तो व्हिडिओ काही वेळातच प्रचंड व्हायरल झाला

रस्त्यातून जात असताना अचानक गाडीचं टायर पंक्चर झालं, कि नुसता वैताग. बाईक पंक्चर सर्विस सेंटर पर्यंत न्यावी लागते. त्यात जर सेंटर जवळ नसेल तर बाईक ढकलत नेण्याची वेळ येते.त्यामुळे मूडचा सत्यानाश होतो तो वेगळाच. पण एका तरूणाने यावर असा काही भन्नाट उपाय शोधलाय त्यामुळे पंक्चरचं दुकान तु्म्हाला हवं तिथे, हवं तसं बोलावू शकता. कर्नाटकातील मंगलूरू येथील एका व्यक्तीने स्वत: च्या बाईकवरचं पंक्चरचं दुकान थाटलं आहे. आता ग्राहकाला दुकान शोधत फिरण्याऐवजी हा मेकॅनिकच बाईकवरून त्याच्यापर्यंत पोहोचतो.
बाईक बनली चालतं फिरतं पंक्चरचं दुकान
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिमध्ये या व्यक्तीची बाईक पाहायला मिळते. या बाईकवर एअर कंप्रेसर, पंक्चर काढण्यासाठी लागणारी साधनं, वेगवेगळे टूल्स आणि रात्री काम करण्यासाठी लाईटचीही व्यवस्था करण्यात आली आहे. म्हणजे पंक्चर काढण्यासाठी लागणांर साहित्य घेऊन हा माणूस बाईकवरूनचं फिरतो.
View this post on Instagram
एखाद्या वाहनचालकाचे कोणतेही वाहन भर रस्त्यात पंक्चर झाले. तर त्याला ते वाहन दुकानापर्यंत घेऊन जाण्याची गरज नाही. फोनवरून संपर्क साधल्यावर ही सेवा थेट घटनास्थळी पोहोचते. महत्त्वाचं म्हणजे भर रस्त्यात अडकलेल्या मोठ्या वाहनांना याचा फायदा होऊ शकतो.
या व्हिडिओला सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या आकाश गुप्ता यांनी या कल्पनेला व्यवसायाचं स्वरूप देण्याबाबत माहिती दिली आहे. दिल्ली – एनसीआर, बंगळूरू,मुंबई, हैदराबाद आणि जयपूर यांसारख्या शहरांमध्ये हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात साजरा केला जाऊ शकतो. त्याला तिथे चांगला स्कोपही आहे. ज्या तरूणांना हा व्यवासयाचं स्वरूप देण्याबाबत आयडियाही दिल्या आहेत. तसेच अशा तरूणांना स्कूटर उपलब्ध करून देणार आहे, अशा सूचनाही दिल्या आहेत.
नेटकऱ्यांनी केलं कौतुक
हा व्हिडिओ पाहून अनेकांनी या व्यक्तीच्या कल्पकतेचं आणि मेहनतीचे कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्याने रात्री किंवा महामार्गावर मदत मिळत नसताना अशी सेवा खूप उपयोगी ठरेल, अशी प्रतिक्रिया दिली. दुसऱ्याने समस्येवर लगेच उपाय शोधणं म्हणजेच खरा उद्योजकपणा असल्याचं म्हटलं. तर आणखी एका यूजरने प्रत्येक शहरात अशी फिरती पंक्चर सेवा सुरू व्हायला हवी,अशी इच्छा व्यक्त केली आहे.
