AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diwali Decoration : या दिवाळीत घरी आणा पाण्यावर पेटणारे दिवे! फक्त थोडंसं पाणी आणि होईल रोषणाई

पाण्यावर पेटणारे दिवे ही संकल्पना आपल्याला किती भारी वाटते ना. तेल, तूप, दरवर्षी दिवाळीत महाग होत असतात.काही ठिकाणी त्याचा तुटवडाही जाणवतो. जिथे मातीचे दिवे लावणं धोक्याचं वाटतं. अशा ठिकाणी पाण्यावर चालणारे दिवे एकदम फायद्याचे. वाचा

Diwali Decoration  : या दिवाळीत घरी आणा पाण्यावर पेटणारे दिवे! फक्त थोडंसं पाणी आणि होईल रोषणाई
diwali lightiningsImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 02, 2026 | 5:04 PM
Share

दिवाळी म्हटलं की घराची साफसफाई, फराळ आणि अर्थातच दिव्यांची रोषणाई! पण यंदाच्या दिवाळीत बाजारात असे काही दिवे आले आहेत. जे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कारण हे दिवे पेटवण्यासाठी ना तेल लागतं. ना तूप आणि ना कापसाची वात! फक्त थोडंसं पाणी टाकलं की हे दिवे आपोआप उजळतात. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत पारंपारिक पणत्यांसोबतच या दिव्यांचीही चर्चा रंगली आहे.

हे दिवे दिसायला साध्या पणतीसारखे असले तरी त्यामध्ये LED तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. दिव्याच्या आत एक छोटी बॅटरी, LED बल्ब आणि दोन धातूचे पिन आहे.दिवा कोरडा असताना सर्किट पूर्ण बंद असल्याने तो बंद राहतो. अशा दिव्यात थोडंसं पाणी टाकलं की पाण्यातील विरघळलेली खनिजे आणि आयन्समुळे त्या दोन पिनमध्ये विद्युत प्रवाहासाठी मार्ग तयार होतो. त्यामुळे सर्किट पूर्ण होतं आणि बॅटरीच्या मदतीने तो दिवा पेटतो.

तेल, वात आणि काडीपेटीची गरज नाही

या दिव्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते पेटवण्यासाठी वेगळं तेल किंवा तूप टाकण्याची गरज नसते.कापसाची वात लावण्याचीहील आवश्यकता नाही. दिवा बंद करायचा असेल तर त्यातील पाणी काढून टाकलं कि सर्किट तुटतं आणि प्रकाश बंद होतो.

मिळालेल्या माहितीनुसार पाण्यावर पेटणारे हे दिवे प्रत्येकी 25 रूपये, तर डझनभर दिवे 240 रूपयांना उपलब्ध आहेत. हे दिवे प्लास्टिकचे बनवलेले असल्यामुळे मातीच्या पणत्यांप्रमाणे सहज फुटण्याची शक्यता नाही. त्यांचा पुन्हा वापर करता येतो. तेल, तूप आणि कापसाची बचत होत असल्यामुळे हे दिवे अनेकांच्या पसंतीस उतरत आहेत.

या दिव्यांचे फायदे :

सुरक्षित आणि प्रदुषणमुक्त : तेल – तूप नसल्यामुळे दिवा सांडल्यामुळे घरात कुठेही डाग पडत नाहीत. तसेच, लहान मुले किंवा पाळीव प्राणी असल्यास आगीचा कोणताही धोका नसतो.

हवेमुळे विझणारचं नाही : हे दिवे तुम्ही खिडकीत, बाल्कनित किंवा घराबाहेर कुठेही ठेवू शकता. कितीही जोराचा वारा आला तरी ते विझत नाहीत.

दीर्घकाळ टिकणारे : या दिव्यांमध्ये छोट्या बॅटऱ्या असतात. एकदा पाणी टाकल्यावर हे दिवे सलग 50 – 60 तास सहज जळू शकतात. बॅटरी संपल्यावर ती बदलताही येते.

हे दिवे खूप महाग नसल्यामुळे दरवर्षी स्वच्छ करून तुम्ही पु्न्हा वापरू शकता. हे दिवे पाण्यावर चालणारे एलईडी दिवे आहेत. पारंपरिक तेलाच्या पणतीप्रमाणे त्यांना खरी ज्योत नसते.त्यामुळे दिवाळीच्या सजावटीसाठी हा एक वेगळा पर्याय नक्कीच ठरू शकतो.

Follow Us
ऐकावं ते नवलंच! सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवल
Sangali : ऐकावं ते नवलंच! सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवलं
दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत.....
Sanjay Ghadi On BJP : दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत मतभेद
दिया मिर्झाने हिंदूंना दिवाळी कशी साजरी करावी हे शिकवू नये...
Ritu Tawde on Dia Mirza : दिया मिर्झाने हिंदूंना दिवाळी कशी साजरी करावी हे शिकवू नये; दिया मिर्झाच्या त्या व्हिडीओवरून महापौर आक्रमक
माझ्याकडे सर्वांचा सातबारा आहे...; रवींद्र धंगेकरांचा रोख कोणाकडे?
Ravindra Dhangekar : माझ्याकडे सर्वांचा सातबारा आहे...; रवींद्र धंगेकरांचा रोख नेमका कोणाकडे?
गोकुळ अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा! कोर्टाचे आदेश काय? 25 संचालकांची...
गोकुळ अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा! कोर्टाचे आदेश काय? 25 संचालकांची महत्त्वपूर्ण सभा अन्...
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 5 हजारांची अग्रिम मदत खात्यात....
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 5 हजारांची अग्रिम मदत खात्यात जमा होण्यास सुरुवात
वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; कमरेला....
Walmik Karad : वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; कमरेला पिस्तूल लावलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
ॲपवर मैत्री करणं पडलं महागात! व्हिडीओच्या आधारे बीडच्या व्यापाऱ्याला..
Beed : ॲपवर मैत्री करणं पडलं महागात! खासगी व्हिडीओच्या आधारे बीडच्या व्यापाऱ्याला तब्बल एवढ्या लाखांचा गंडा
राष्ट्रवादीच्या नेत्यांची अमित शाहांशी रात्री उशिरा भेट; राजकीय चर्चां
राष्ट्रवादीच्या नेत्यांची अमित शाहांशी रात्री उशिरा भेट; राजकीय चर्चांना उधाण
दिया मिर्झाचा दिवाळी व्हिडिओ पालिकेने हटवला; अमित साटम यांचा आक्षेप
दिया मिर्झाचा दिवाळी व्हिडिओ पालिकेने हटवला; अमित साटम यांच्या आक्षेपानंतर काय घडलं?