AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Redmi ने लाँच केला OLED डिस्प्लेचा बजेट फोन, 50MP चा कॅमेरा, किंमत किती ?

Redmi ने आणखी एक बजेट फ्रेंडली फोन लाँच केला आहे. चीनी कंपनीचा हा फोन 5500mAh च्या दमदार बॅटरीसह येतो. या फोनला

Redmi ने लाँच केला OLED डिस्प्लेचा बजेट फोन, 50MP चा कॅमेरा, किंमत किती ?
Redmi M100 Pro
| Updated on: Nov 02, 2026 | 4:58 PM
Share

Redmi M100 Pro बजेट फ्रेंडली 5G स्मार्टफोन चीनमध्ये लाँच झाला आहे. रेडमीचा हा बजेट फ्रेंडली फोन Redmi Note 14 Pro चा रीब्रांडेंड व्हेरिएंट आहे. याचे फिचर्स चीनमध्ये आधीच लाँच झालेल्या Note 14 Pro सारखेच आहे. रेडमीचा हा स्मार्टफोन 12GB रॅमच्या सोबत सादर केला आहे. कंपनीने अलिकडेच K100 स्मार्टफोन सादर केला आहे. K100 स्मार्टफोन गेमिंग फोन 10,000mAh च्या दमदार बॅटरी सोबत येतो.

Redmi M100 Pro ची किंमत

Xiaomi च्या सब ब्रँडचा हा दमदार फोन एकच स्टोरेज व्हेरिएंट 12GB RAM + 256GB मध्ये येतो. या फोनची किंमत CNY 2499 म्हणजे सुमारे 33,000 रुपये आहे. हा फोन Midnight Black, Mirror Porcelain, Phantom Blue आणि Twilight Purple कलरच्या पर्यायात येतो.

Redmi M100 Pro चे फिचर्स

रेडमीचा हा बजेट फ्रेंडली फोन 6.67 इंचाचा 1.5K OLED डिस्प्ले पॅनलसह येतो. या फोनचा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तसेच याचा पीक ब्रायटनेस 3000 निट्सपर्यंतचा आहे. कंपनीने डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विकटस 2 दिला आहे.

Redmi चा हा फोन MediaTek Dimensity 7300 Ultra चिपसेटसह येतो. फोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB ऑनबोर्ड स्टोरेजचा स्टोरेजचा सपोर्ट मिळतो. या फोनमध्ये कनेक्टिव्हीटीसाठी 5G, WiFi 6, USB Type C, Bluetooth 5.4, GPS, NFC सारखे फिचर्स दिले आहेत. यात कंपनीने IP68 वॉटरप्रूफ रेटिंग दिली आहे. तसेच यात इन-डिस्प्ले फिंगर प्रिंट सेंसर देखील दिला आहे. रेडमीच्या अन्य फोन सारखे यात IR Blaster देण्यात आला आहे.

20MP चा फ्रंट कॅमेरा

रेडमीचा हा फोन ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येतो. यात 50MP चा मुख्य OIS कॅमेरा देण्यात आला आहे. या सोबत 8MP चा अल्ट्रा वाईड कॅमरा आणि 2MP चा मायक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 20MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीने फोनमध्ये 5,500mAh ची बॅटरी दिली आहे. जिच्या सोबत 45W वायर्ड फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळणार आहे. हा Android 16 वर बेस्ड HyperOS 3 वर काम करतो.

Follow Us
दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत.....
Sanjay Ghadi On BJP : दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत मतभेद
दिया मिर्झाने हिंदूंना दिवाळी कशी साजरी करावी हे शिकवू नये...
Ritu Tawde on Dia Mirza : दिया मिर्झाने हिंदूंना दिवाळी कशी साजरी करावी हे शिकवू नये; दिया मिर्झाच्या त्या व्हिडीओवरून महापौर आक्रमक
माझ्याकडे सर्वांचा सातबारा आहे...; रवींद्र धंगेकरांचा रोख कोणाकडे?
Ravindra Dhangekar : माझ्याकडे सर्वांचा सातबारा आहे...; रवींद्र धंगेकरांचा रोख नेमका कोणाकडे?
गोकुळ अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा! कोर्टाचे आदेश काय? 25 संचालकांची...
गोकुळ अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा! कोर्टाचे आदेश काय? 25 संचालकांची महत्त्वपूर्ण सभा अन्...
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 5 हजारांची अग्रिम मदत खात्यात....
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 5 हजारांची अग्रिम मदत खात्यात जमा होण्यास सुरुवात
वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; कमरेला....
Walmik Karad : वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; कमरेला पिस्तूल लावलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
ॲपवर मैत्री करणं पडलं महागात! व्हिडीओच्या आधारे बीडच्या व्यापाऱ्याला..
Beed : ॲपवर मैत्री करणं पडलं महागात! खासगी व्हिडीओच्या आधारे बीडच्या व्यापाऱ्याला तब्बल एवढ्या लाखांचा गंडा
राष्ट्रवादीच्या नेत्यांची अमित शाहांशी रात्री उशिरा भेट; राजकीय चर्चां
राष्ट्रवादीच्या नेत्यांची अमित शाहांशी रात्री उशिरा भेट; राजकीय चर्चांना उधाण
दिया मिर्झाचा दिवाळी व्हिडिओ पालिकेने हटवला; अमित साटम यांचा आक्षेप
दिया मिर्झाचा दिवाळी व्हिडिओ पालिकेने हटवला; अमित साटम यांच्या आक्षेपानंतर काय घडलं?
दिवाळीच्या सेलिब्रिटी कॅम्पेनवरुन पालिकेत वादाची शक्यता, दिया मिर्झा..
Mumbai BMC : दिवाळीच्या सेलिब्रिटी कॅम्पेनवरुन पालिकेत वादाची ठिणगी