AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सातारा आहे की बिहार? मध्यरात्री महालक्ष्मी एक्स्प्रेसवर दरोडा; अवघ्या 15 मिनिटांत…नेमकं काय घडलं?

मध्यरात्री महालक्ष्मी एक्स्प्रेसवर दरोड्याची घटना घडली आहे. प्रवासी गाढझोपेत असतानाच ट्रेनमध्ये भयंकर प्रकार घडला. या घटनेने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.

सातारा आहे की बिहार? मध्यरात्री महालक्ष्मी एक्स्प्रेसवर दरोडा; अवघ्या 15 मिनिटांत...नेमकं काय घडलं?
mahalaxmi expressImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 02, 2026 | 9:22 AM
Share

मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसवर दरोड्याची घटना घडली आहे. रविवारी मध्यरात्री घडलेल्या घटनेने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. प्रवासी गाढझोपेत असताना चोरट्यांनी डाव साधला. सातारा जिल्ह्यात घडलेल्या दरोड्याच्या घटनेने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-मिरज रेल्वे मार्गावरील साताऱ्यात सालपे रेल्वे स्थानकाजवळ महालक्ष्मी एक्स्प्रेसवर दरोड्याची घटना घडली आहे. महालक्ष्मी एक्स्प्रेसवर दरोडा टाकण्यासाठी चोरट्यांनी सिग्नल यंत्रणेच्या वायर कापल्या.  चोरट्यांनी वायर कापून महालक्ष्मी एक्स्प्रेस 15 मिनिटे रोखून धरली. ट्रेन थांबल्यानंतर चोरट्यांनी खिडकीतून हा घालून दोन महिला प्रवाशांचे 52 हजार 600 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हिसकावून नेलं.

एक्स्प्रेसवर दरोडा पडल्याची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने पहाटे सव्वापाच वाजेपर्यंत दुरुस्ती करत सिग्नल यंत्रणा पूर्ववत केली. या सिग्नल तोडफोडीबाबत लोणंद आरपीएफमध्ये आणि दागिने चोरी प्रकरणी मिरज लोहमार्ग पोलिसांत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरोड्यानंतर पोलिसांकडून श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीमच्या मदतीने याचा सखोल तपास सुरू आहे.

नेमकं काय घडलं? 

साताऱ्याच्या सालपा स्टेशनजवळ रविवारी मध्यरात्री अचानक ट्रेन थांबली. ट्रेन थांबल्याने कोणाला काहीच समजले नाही. याच संधीचा फायदा चोरट्यांनी घेतला. चोरट्यांनी एक्स्प्रेसच्या एस-2, एस-3 आणि एस-5 डब्यांमध्ये प्रवेश केला. मुंबईतील रहिवासी सुनिता गोरक्षनात तुपे आणि सहप्रवासी सुरेखा खाडे (खोपोली) हे कौटुंबिक कार्यक्रमांसाठी कोल्हापूरला निघाले होते. या दरोडेखोरांनी त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने खिडकीचा आधार घेऊन हिसकावले.

चोरी केल्यानंतर दरोडेखोरांनी पळ काढला. परंतु या चोरट्यांनी रेल्वेवरच दगडफेक केली. या दरोड्याच्या घटनेने प्रवाशांमध्ये मोठी दहशत पसरली. सिग्नल यंत्रणेत नेमका बिघाड कसा झाला, याचा प्रश्न प्रशासनाला पडला. तसेच हा दरोडा पूर्वनियोजित कट होता का, यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत. आता पोलिसांचं पथक हे पुढील कारवाईसाठी साताऱ्याला रवाना झाले आहेत. दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Follow Us
मोठी बातमी! तुकाराम मुंडेंच्या धडक कारवाईला अचानक स्थगिती, कारण काय?
मोठी बातमी! तुकाराम मुंडेंच्या धडक कारवाईला अचानक स्थगिती, नेमकं कारण काय?
कर्जतकरांचा एल्गार! टोरंट प्रकल्पातील वृक्षतोडीविरोधात आज कर्जत बंद,
कर्जतकरांचा एल्गार! टोरंट प्रकल्पातील वृक्षतोडीविरोधात आज कर्जत बंद, ठाकरे गट रस्त्यावर
एकीकडे दुष्काळाचे सावट, तर दुसरीकडे पुण्यात रात्रभर धो-धो पाऊस,
एकीकडे दुष्काळाचे सावट, तर दुसरीकडे पुण्यात रात्रभर धो-धो पाऊस, नागरिकांची तारांबळ
शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बिनसलं? प्रताप सरनाईकांविरोधात...
शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बिनसलं? प्रताप सरनाईकांविरोधात मीरा भाईंदरमध्ये आंदोलनाची तयारी!
महायुतीत मोठं घडतंय? बड्या नेत्याचा सूचक इशारा, म्हणाले, 'हे तर हिमनग
महायुतीत मोठं घडतंय? बड्या नेत्याचा सूचक इशारा, म्हणाले, 'हे तर हिमनगाचे छोटे टोक! आणखी...
पदवीधर निवडणुकीतील पराभव भाजपच्या जिव्हारी! 108 नगरसेवकांची झाडाझडती,
पदवीधर निवडणुकीतील पराभव भाजपच्या जिव्हारी! 108 नगरसेवकांची झाडाझडती, फडणवीसांच्या उपस्थितीत...
अमृता फडणवीस यांची राज ठाकरेंवर प्रतिक्रिया; वक्तव्याची हेडलाईन कशी...
अमृता फडणवीस यांची राज ठाकरेंवर प्रतिक्रिया; वक्तव्याची हेडलाईन कशी होईल हे त्यांना...
अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास...
Amit Shah : अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास; अखिलेश यादवांनी एका वाक्यात दिलं प्रत्युत्तर
साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय...
Satara Rain : साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री थेट.. नेमकं काय घडलं?
Eknath Shinde On Purnekar Case : पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट...; नेमकं काय घडलं?