मोठी बातमी! तुकाराम मुंडेंच्या धडक कारवाईला अचानक स्थगिती, नेमकं कारण काय?
पुण्यातील रांजणगावमधील एका मिथेनॉल कंपनीवरील कारवाईला अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी स्थगिती दिली आहे. पुण्यात झालेल्या विषारी दारू प्रकरणानंतर आयुक्त तुकाराम मुंडे यांनी ही कारवाई केली होती. कंपनीचा संबंध राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी असल्याने ही स्थगिती दिल्याची चर्चा आहे.
पुण्यातील रांजणगाव येथील एका मिथेनॉल कंपनीवरील कारवाईला अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी स्थगिती दिली आहे. ही कारवाई पुण्यातील विषारी दारू प्रकरणानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी केली होती. या दारू प्रकरणामुळे जवळपास १९ जणांचा मृत्यू झाला होता. तुकाराम मुंडे यांनी राज्यातील जवळपास ७० मिथेनॉल कंपन्यांच्या विक्रीतील अनियमिततेमुळे त्यांचे परवाने रद्द केले होते.
कारवाई झालेल्या कंपन्यांपैकी २२ कंपन्यांनी अन्न व औषध विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे दाद मागितली होती. रांजणगाव येथील मिथेनॉल कंपनीला दिलेली स्थगिती याचसंदर्भात आहे. सूत्रांनुसार, ही कंपनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान आमदाराशी संबंधित असून काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचाही यात सहभाग असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळेच झिरवळ यांनी या कंपनीवरील कारवाईला स्थगिती दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या स्थगितीमुळे पुन्हा एकदा पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
Published on: Nov 02, 2026 09:50 AM
मोठी बातमी! तुकाराम मुंडेंच्या धडक कारवाईला अचानक स्थगिती, कारण काय?
कर्जतकरांचा एल्गार! टोरंट प्रकल्पातील वृक्षतोडीविरोधात आज कर्जत बंद,
एकीकडे दुष्काळाचे सावट, तर दुसरीकडे पुण्यात रात्रभर धो-धो पाऊस,
शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बिनसलं? प्रताप सरनाईकांविरोधात...

