AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्जतकरांचा एल्गार! टोरंट प्रकल्पातील वृक्षतोडीविरोधात आज कर्जत बंद, ठाकरे गट रस्त्यावर

कर्जतकरांचा एल्गार! टोरंट प्रकल्पातील वृक्षतोडीविरोधात आज कर्जत बंद, ठाकरे गट रस्त्यावर

| Updated on: Nov 02, 2026 | 9:30 AM
Share

साई डोंगर जंगल वाचवण्यासाठी कर्जत तालुक्यात आज बंदची हाक देण्यात आली आहे. टोरंट जलविद्युत निर्मिती प्रकल्पासाठी होणाऱ्या वृक्षतोडीला ठाकरे गटाने तीव्र विरोध दर्शवला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर, आदित्य ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांनीही या प्रकल्पाला विरोध केला होता. जंगल वाचवा, निसर्ग वाचवा या घोषणेसह कर्जतकर एकवटले आहेत.

टोरंट जलविद्युत निर्मिती प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या वृक्षतोडीविरोधात आज कर्जत तालुक्यात बंदची हाक देण्यात आली आहे. भीमाशंकर पायथ्याशी असलेल्या साई डोंगर परिसरातील मोठ्या प्रमाणात झालेल्या जंगलतोडीमुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या विरोधात जंगल वाचवा, निसर्ग वाचवा ही घोषणा देत कर्जतकरांनी एल्गार पुकारला आहे. या आंदोलनात ठाकरे गट (शिवसेना) आघाडीवर असून, त्यांच्या वतीने आज कर्जत बंदची हाक देण्यात आली आहे. सकाळपासूनच कर्जतमधील बाजारपेठांमधील दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.

ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरून दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करत आहेत. अनेक संघटनांनीही या बंदला पाठिंबा दर्शवला आहे. यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही वृक्षतोड झालेल्या परिसराची पाहणी केली होती. त्यांनीही हा प्रकल्प होऊ न देण्याची भूमिका स्पष्ट केली होती, ज्यामुळे या प्रकल्पाभोवती राजकीय वातावरण तापले आहे.

Published on: Nov 02, 2026 09:30 AM

Follow Us