AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rupali Bhosale: लग्नाच्या 7 वर्षांनंतर घटस्फोट, आज फक्त ‘या’ व्यक्तीसाठी अविवाहित आहे रुपाली भोसले, स्पष्टच म्हणाली…

Rupali Bhosale : अभिनेत्री रुपाली भोसले तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. एका मुलाखतीत अभिनेत्री स्पष्ट म्हणालेली, 'मी रिलेशनशिपमध्ये आहे...', तर जाणून घ्या पहिल्या घटस्फोटानंतर रुपाली कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे आणि लग्न कधी करणार...

Rupali Bhosale: लग्नाच्या 7 वर्षांनंतर घटस्फोट, आज फक्त 'या' व्यक्तीसाठी अविवाहित आहे रुपाली भोसले, स्पष्टच म्हणाली...
Rupali Bhosale
| Updated on: Nov 02, 2026 | 9:42 AM
Share

Rupali Bhosale : अभिनेत्री रुपाली भोसले हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. रुपाली कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली रुपाली ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात शेफ पराग कान्हेरे याच्यासोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली होती. तर रुपाली हिच्या पहिल्या घटस्फोटाबद्दल फार कोणाल माहिती नाही. लग्नाच्या सात वर्षांनंतर अभिनेत्रीचा घटस्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार, रुपालीने पहिलं लग्न लंडट येथील एका उद्योजकासोबत केलं होतं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. घटस्फोटानंतर रुपाली पुन्हा भारतात परतली. पण बिग बॉसच्या घरात अभिनेत्री अनेकदा तिच्या नात्याबद्दल कुटुंबाबत बोलताना दिसली. तर घटस्फोटानंतर पुन्हा रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा खुद्द रुपाली हिने एका मुलाखतीत केलेला.

रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा करत रुपाली भोसले म्हणालेली, ‘मी डेट करत आहे… मी रिलेशनशिपमध्ये आहे. मला सुद्धा आयुष्यात पुढे जायचं आहे, पण जोपर्यंत संकेतचं (रुपालीचा भाऊ) सर्व काही चांगलं होत नाही, त्याचे दोनाचे चार हात होत नाहीत, तोपर्यंत मला त्या दिशेने विचार करता येणार नाही. कोणी चांगली मुलगी त्याला सांभाळण्यासाठी आली तर, मी माझा विचार करायला मोकळी…आता मी माझा विचार केल्यानंतर देखील संकेतचे विचार मला सतावत राहतील. त्यामुळे मी देखील त्या घरी ती माणसं आनंदात राहणार नाहीत… ना मी आनंदात राहणार…’

‘जी व्यक्ती माझ्या आयुष्यात येणार असेल, त्या व्यक्तीला देखील माझं कुटुंब त्याची जबाबदारी असल्यासारखं वाटलं पाहिजे. जोपर्यंत माझे आई – बाबा आहेत तोपर्यंत तरी… माझे आई – बाबा माझी जबाबदारी आहे. उद्या संकेत म्हणाला की, आम्हाला वेगळं रहायचं आहे, तरीही काहीच प्रॉब्लेम नाही. त्यामुळे घडी व्यवस्थीत बसत नाही, तोपर्यंत मी माझ्या लग्नाचा विचार करणार नाही… माझं लग्नाचं वय अद्याप झालं नाही. ‘, असं देखील रुपाली म्हणाली.

रुपाली हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत रुपाली हिने चाहत्यांचं मनोरंजन केलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील अभिनेत्री कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. रुपाली देखील सोशल मीडियावर कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

Follow Us
मोठं चक्रीवादळ भारताच्या दिशेने; सागरी किनाऱ्याजवळच्या राज्यांना ...
Weather Alert: मोठं चक्रीवादळ भारताच्या दिशेने; सागरी किनाऱ्याजवळच्या 3 राज्यांना तातडीने अलर्ट जारी
वृक्षतोडीवरून अंबादास दानवे आक्रमक; CM फडणवीसांना पत्राद्वारे...
सोयगावमधील वृक्षतोडीवरून अंबादास दानवे आक्रमक; फडणवीसांना पत्र लिहित केली मोठी मागणी!
मोठी बातमी! तुकाराम मुंडेंच्या धडक कारवाईला अचानक स्थगिती, कारण काय?
मोठी बातमी! तुकाराम मुंडेंच्या धडक कारवाईला अचानक स्थगिती, नेमकं कारण काय?
कर्जतकरांचा एल्गार! टोरंट प्रकल्पातील वृक्षतोडीविरोधात आज कर्जत बंद,
कर्जतकरांचा एल्गार! टोरंट प्रकल्पातील वृक्षतोडीविरोधात आज कर्जत बंद, ठाकरे गट रस्त्यावर
एकीकडे दुष्काळाचे सावट, तर दुसरीकडे पुण्यात रात्रभर धो-धो पाऊस,
एकीकडे दुष्काळाचे सावट, तर दुसरीकडे पुण्यात रात्रभर धो-धो पाऊस, नागरिकांची तारांबळ
शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बिनसलं? प्रताप सरनाईकांविरोधात...
शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बिनसलं? प्रताप सरनाईकांविरोधात मीरा भाईंदरमध्ये आंदोलनाची तयारी!
महायुतीत मोठं घडतंय? बड्या नेत्याचा सूचक इशारा, म्हणाले, 'हे तर हिमनग
महायुतीत मोठं घडतंय? बड्या नेत्याचा सूचक इशारा, म्हणाले, 'हे तर हिमनगाचे छोटे टोक! आणखी...
पदवीधर निवडणुकीतील पराभव भाजपच्या जिव्हारी! 108 नगरसेवकांची झाडाझडती,
पदवीधर निवडणुकीतील पराभव भाजपच्या जिव्हारी! 108 नगरसेवकांची झाडाझडती, फडणवीसांच्या उपस्थितीत...
अमृता फडणवीस यांची राज ठाकरेंवर प्रतिक्रिया; वक्तव्याची हेडलाईन कशी...
अमृता फडणवीस यांची राज ठाकरेंवर प्रतिक्रिया; वक्तव्याची हेडलाईन कशी होईल हे त्यांना...
अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास...
Amit Shah : अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास; अखिलेश यादवांनी एका वाक्यात दिलं प्रत्युत्तर