AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे, रत्नागिरी जिल्ह्यात धो धो पाऊस, मुरासू चक्रीवादळाने फिरले वारे, हवामान विभागाचा 24 तासांसाठी इशारा..

राज्यातील हवामानात मोठा बदल झाला. भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्यात पुन्हा पावसाचे दिवस आले आहेत. मुसळधार पाऊस अनेक भागात कोसळताना दिसत आहे. पुढील काही दिवस राज्यात पाऊस कायम राहिल.

पुणे, रत्नागिरी जिल्ह्यात धो धो पाऊस, मुरासू चक्रीवादळाने फिरले वारे, हवामान विभागाचा 24 तासांसाठी इशारा..
heavy rainfall
| Updated on: Nov 02, 2026 | 10:28 AM
Share

भारतीय हवामान विभागाने राज्यात पावसाचा मोठा इशारा दिला. राज्यातील अनेक भागात पाऊस कोसळताना दिसत आहे. त्यातच पुण्यात चांगलाच मुसळधार पाऊस झाला. बारामती शहर आणि परिसरात रात्रीपासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बारामती-भिगवण रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने हा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे बारामती शहरातील अनेक भागांत पाणी साचण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः बारामती भिगवण रोडवर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात जमा झाल्याने रस्त्यावरून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अवकाळी पावसाने चाकण परिसराला अक्षरशः धुवून काढले. काही वेळ जोरदार पावसाने शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणली आहे. चाकणमधील अनेक रस्त्यांना अक्षरशः नदीचे स्वरूप प्राप्त झाले असून, पुणे-नाशिक महामार्ग आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गावर सर्वत्र पाणीच पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले.

रस्ते वाहतुकीसाठी आहेत, की पावसाचे पाणी साठवण्यासाठी, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रत्नागिरीत काल जवळपास दीड तास पडलेल्या पावसाने कापलेल्या भाताचे मोठे नुकसान झाले. काल झालेल्या पावसामुळे रत्नागिरीत उडाली दाणादाण. जवळपास दीड तास पडलेल्या पावसाने कापलेल्या भात शेतीचे नुकसान झाले.

कापलेली भात शेती अवकाळी पावसामुळे भिजली. रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं. आज देखील कोकणात पावसाचा इशारा देण्यात आला. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मुरासू चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण तयार झाले. कोकणात काही ठिकाणी ढगाळ वातावरण आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमधील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला असून या भागांना येलो अलर्ट जारी करण्यात आला. पुण्याच्या भोर तालुक्यातील खेड शिवापूर परिसरात काल संध्याकाळी पडलेल्या मुसळधार पावसाने, पुणे सातारा महामार्गावर पाणीच-पाणी झाले. काहीकाळ पडलेल्या या मुसळधार पावसाने खेडशिवापूर उड्डाणपुलाजवळील महामार्गावरील रस्ता जलमय झाला.

रस्त्यावर पाणीच पाणी साचल्याने वाहन चालकांना यातून मार्ग काढताना कसरत करावी लागली. या पावसामुळं हवेत गारवा पसरल्याने..काही दिवसांपासून जाणवत असलेल्या उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला. मुंबईत आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून हलक्या पावसाची आज मुंबईत शक्यता आहे.

Follow Us
वृक्षतोडीवरून अंबादास दानवे आक्रमक; CM फडणवीसांना पत्राद्वारे...
सोयगावमधील वृक्षतोडीवरून अंबादास दानवे आक्रमक; फडणवीसांना पत्र लिहित केली मोठी मागणी!
मोठी बातमी! तुकाराम मुंडेंच्या धडक कारवाईला अचानक स्थगिती, कारण काय?
मोठी बातमी! तुकाराम मुंडेंच्या धडक कारवाईला अचानक स्थगिती, नेमकं कारण काय?
कर्जतकरांचा एल्गार! टोरंट प्रकल्पातील वृक्षतोडीविरोधात आज कर्जत बंद,
कर्जतकरांचा एल्गार! टोरंट प्रकल्पातील वृक्षतोडीविरोधात आज कर्जत बंद, ठाकरे गट रस्त्यावर
एकीकडे दुष्काळाचे सावट, तर दुसरीकडे पुण्यात रात्रभर धो-धो पाऊस,
एकीकडे दुष्काळाचे सावट, तर दुसरीकडे पुण्यात रात्रभर धो-धो पाऊस, नागरिकांची तारांबळ
शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बिनसलं? प्रताप सरनाईकांविरोधात...
शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बिनसलं? प्रताप सरनाईकांविरोधात मीरा भाईंदरमध्ये आंदोलनाची तयारी!
महायुतीत मोठं घडतंय? बड्या नेत्याचा सूचक इशारा, म्हणाले, 'हे तर हिमनग
महायुतीत मोठं घडतंय? बड्या नेत्याचा सूचक इशारा, म्हणाले, 'हे तर हिमनगाचे छोटे टोक! आणखी...
पदवीधर निवडणुकीतील पराभव भाजपच्या जिव्हारी! 108 नगरसेवकांची झाडाझडती,
पदवीधर निवडणुकीतील पराभव भाजपच्या जिव्हारी! 108 नगरसेवकांची झाडाझडती, फडणवीसांच्या उपस्थितीत...
अमृता फडणवीस यांची राज ठाकरेंवर प्रतिक्रिया; वक्तव्याची हेडलाईन कशी...
अमृता फडणवीस यांची राज ठाकरेंवर प्रतिक्रिया; वक्तव्याची हेडलाईन कशी होईल हे त्यांना...
अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास...
Amit Shah : अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास; अखिलेश यादवांनी एका वाक्यात दिलं प्रत्युत्तर
साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय...
Satara Rain : साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद