AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोयगावमधील वृक्षतोडीवरून अंबादास दानवे आक्रमक; फडणवीसांना पत्र लिहित केली मोठी मागणी!

सोयगावमधील वृक्षतोडीवरून अंबादास दानवे आक्रमक; फडणवीसांना पत्र लिहित केली मोठी मागणी!

| Updated on: Nov 02, 2026 | 10:14 AM
Share

अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोयगाव रेंजमधील प्रस्तावित वृक्षतोडीविरोधात पत्र लिहिले आहे. वनविभाग आणि ग्रामपंचायतीच्या नकारात्मक अहवालानंतरही वृक्षतोड प्रस्तावित असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकल्पाला तात्काळ रद्द करण्याची मागणी दानवे यांनी पत्राद्वारे केली आहे.

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव रेंजमध्ये प्रस्तावित असलेल्या वृक्षतोडीच्या प्रकल्पाविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी प्रस्तावित वृक्षतोड तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. सोयगावमधील मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्याच्या प्रस्तावित प्रकल्पाबाबत दानवे यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी पत्रात नमूद केले आहे की, या प्रकल्पाला वनविभाग आणि संबंधित ग्रामपंचायतीकडूनही विरोध दर्शवण्यात आला आहे. या दोन्ही घटकांकडून नकारात्मक अहवाल प्राप्त होऊनही हा वृक्षतोडीचा प्रकल्प पुढे नेला जात असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे.

पर्यावरणासाठी अत्यंत संवेदनशील असलेल्या या परिसरात होणाऱ्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात, असे दानवे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. या संदर्भात तातडीने लक्ष घालून सोयगाव रेंजमधील प्रस्तावित वृक्षतोडीचा प्रकल्प तत्काळ रद्द करावा, अशी मागणी अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Published on: Nov 02, 2026 10:13 AM

Follow Us