AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अहिल्यानगर बँकेच्या निवडणुकीत आश्चर्याचा धक्का बसणार; दोन कट्टर विरोधक आमने-सामने, चेअरमन पद…

अहिल्यानगर बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतदोन होत आहे. या निवडणुकीत दोन कट्टर विरोधकांचा सामना होणार होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

अहिल्यानगर बँकेच्या निवडणुकीत आश्चर्याचा धक्का बसणार; दोन कट्टर विरोधक आमने-सामने, चेअरमन पद...
election news Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 02, 2026 | 10:01 AM
Share

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या १० जागांसाठी आज मतदान होणार आहे. 21 पैकी 11 जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यातील उर्वरित 10 जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत 3 हजार 837 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.  नगरच्या 14 तालुक्यांतील 33 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया होणार आहे.  या निवडणुकीत विखे-थोरात सहकार पॅनल विरुद्ध खासदार निलेश लंके यांच्या परिवर्तन पॅनल सामना होणार आहे. दोन्ही नेते एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात. पारनेरमधील निलेश लंके विरुद्ध विखे समर्थक राहुल शिंदे लढतीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

विखे पाटलांचा मोठा दावा 

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सुजय विखे पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी राहता येथील मतदान केंद्रात सुजय विखे यांनी मतदानाचा हक्क बजावला.  त्यानंतर सुजय विखे पाटील म्हणाले, सहकारात निवडणूक बिनविरोध व्हावी ही अपेक्षा असते. मात्र प्रत्येकाला संधी देणे शक्य नसतं. या निवडणूक प्रचारात कुठेही आरोप-प्रत्यारोप आणि चिखलपेक झाली नाही. अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वांनी सहकारातील सुसंस्कृतपणा कायम राखला. चेअरमन पदासाठी माध्यमांनी माझे नाव चर्चेत ठेवलं. मात्र जेव्हा कधी चेअरमनची निवड होईल, तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का लागेल, एवढे मात्र निश्चित आहे’.

बाळासाहेब थोरात निलेश लंकेंवर काय म्हणाले?

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी बाळासाहेब थोरात यांनी मतदानाचा हक्क बजावला.  संगमनेर येथील मतदान केंद्रावर बाळासाहेब थोरात यांनी मतदान केलं. त्यानंतर बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न होता. 11 जागा बिनविरोध झाल्या, सर्व एकत्र बसले हे काही कमी नाही’.

निलेश लंके यांच्यावर थोरात म्हणाले, ‘प्रत्येक तालुक्याचे राजकारण वेगळं असतं. स्थानिक पातळीला काही संघर्ष असतात. मात्र जे झालं ते ठीक झालं असच म्हणावं लागेल. राजकारण व्यक्तिगत स्वरूपाचे नसावं. सहकारात एका पक्षाचे लोक संस्थेवर जाऊ शकत नाही. विविध पक्ष असतातच. मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे, हे राजकारणाचे गमक असतं. अलीकडच्या काळात व्यक्तीद्वेष वाढला आहे.

Follow Us
मोठी बातमी! तुकाराम मुंडेंच्या धडक कारवाईला अचानक स्थगिती, कारण काय?
मोठी बातमी! तुकाराम मुंडेंच्या धडक कारवाईला अचानक स्थगिती, नेमकं कारण काय?
कर्जतकरांचा एल्गार! टोरंट प्रकल्पातील वृक्षतोडीविरोधात आज कर्जत बंद,
कर्जतकरांचा एल्गार! टोरंट प्रकल्पातील वृक्षतोडीविरोधात आज कर्जत बंद, ठाकरे गट रस्त्यावर
एकीकडे दुष्काळाचे सावट, तर दुसरीकडे पुण्यात रात्रभर धो-धो पाऊस,
एकीकडे दुष्काळाचे सावट, तर दुसरीकडे पुण्यात रात्रभर धो-धो पाऊस, नागरिकांची तारांबळ
शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बिनसलं? प्रताप सरनाईकांविरोधात...
शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बिनसलं? प्रताप सरनाईकांविरोधात मीरा भाईंदरमध्ये आंदोलनाची तयारी!
महायुतीत मोठं घडतंय? बड्या नेत्याचा सूचक इशारा, म्हणाले, 'हे तर हिमनग
महायुतीत मोठं घडतंय? बड्या नेत्याचा सूचक इशारा, म्हणाले, 'हे तर हिमनगाचे छोटे टोक! आणखी...
पदवीधर निवडणुकीतील पराभव भाजपच्या जिव्हारी! 108 नगरसेवकांची झाडाझडती,
पदवीधर निवडणुकीतील पराभव भाजपच्या जिव्हारी! 108 नगरसेवकांची झाडाझडती, फडणवीसांच्या उपस्थितीत...
अमृता फडणवीस यांची राज ठाकरेंवर प्रतिक्रिया; वक्तव्याची हेडलाईन कशी...
अमृता फडणवीस यांची राज ठाकरेंवर प्रतिक्रिया; वक्तव्याची हेडलाईन कशी होईल हे त्यांना...
अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास...
Amit Shah : अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास; अखिलेश यादवांनी एका वाक्यात दिलं प्रत्युत्तर
साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय...
Satara Rain : साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री थेट.. नेमकं काय घडलं?
Eknath Shinde On Purnekar Case : पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट...; नेमकं काय घडलं?