AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्या नावाने अमिताभ यांना हाक मारायच्या जया बच्चन, एक दिवस सासऱ्याने टोकले आणि…

अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपतीमध्ये पत्नी जया बच्चन यांच्याशी संबंधित एक खासगी किस्सा सांगितला. लग्नानंतर अनेक वर्षे जया त्यांना 'लंबूजी' म्हणून हाक मारायच्या. परंतु एकदा अमिताभ यांच्या वडिलांनी जया यांना असे बोलण्यास मनाई केली. त्यानंतर जया यांनी कधीही तो शब्द वापरला नाही.

त्या नावाने अमिताभ यांना हाक मारायच्या जया बच्चन, एक दिवस सासऱ्याने टोकले आणि...
Amitabh Bachchan-Jaya BachchanImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 02, 2026 | 10:22 PM
Share

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची जोडी जशी सिनेमात हिट ठरली तसेच सार्वजनिक जीवनात पती-पत्नी म्हणून हे दोन्ही कपल प्रेरणादायी आणि लोकप्रिय आहेत. दोघांच्या उंचीत जमीन अस्मानचा फरक आहे. त्यामुळे त्यांच्या हाइटवरूनही चर्चा होते. कौन बनेगा करोडपतीमध्ये अमिताभ बच्चन यांनी एक खासगी किस्सा ऐकवला होता. जया बच्चन त्यांना एका विशिष्ट शब्दाने हाक मारायच्या. पण एकदा अमिताभ यांच्या वडिलांनी जया बच्चन यांना टोकलं. त्यानंतर जया यांनी तो शब्द परत कधीच वापरला नाही.

केबीसीच्या एका एपिसोडमध्ये रणबीर कपूर, साई पल्लवी आणि रवी दुबे हे रामायण या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आले होते. त्यावेळी अमिताभ यांनी हा किस्सा ऐकवला. लग्नानंतर अनेक वर्ष जया मला लंबूजी म्हणून हाक मारायची. मला लंबूजी म्हणून चिडवायची. जया मला अनेक वर्ष अशा पद्धतीने हाक मारायची. एकदा बाबूजींनी तिला बोलावून घेतलं आणि परत या शब्दाने हाक मारू नको म्हणून सांगितलं. एक तर नावाने हाक मार किंवा दुसरी काही हाक मार, असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर जयाने मला कधीच लंबूजी म्हटलं नाही, असं अमिताभ बच्चन यांनी सांगितलं.

रणबीरची तुलना

यावेळी रणबीर कपूर यांनी एक मनातील गोष्ट ऐकवली. तो स्वत: त्याची आणि आलियाची बिग बी आणि जया बच्चनशी तुलना करतो. या दोघांच्या जागी स्वत:ला ठेवतो. मी नेहमी असा विचार करतो की मी अमिताभ बच्चन यांच्या सारखा लंबू असतो आणि आलिया जया आंटी सारखी छोटी असती तर आम्ही जोडी कशी दिसली असती? मी नेहमी स्वत:ला इमॅजिन करून पाहत असतो, असं रणबीर म्हणाला. रणबीरने ही तुलना केल्यानंतर अमिताभ यांना हसू आवरलं नाही. ते जोरजोरात हसू लागले. त्यानंतर रणबीरने दोघांची हाईट किती विचारलं. त्यावर माझी 6 फूट 2 इंज आणि जयाची 5 फूट 3 किंवा 4 इंच असेल, असं अमिताभ यांनी स्पष्ट केलं.

गुड्डीच्यावेळी भेट

बिग बी आणि जया बच्चन यांची गुड्डी सिनेमाच्या वेळी भेट झाली. त्यानंतर 1972मध्ये दोघे एका सिनेमात दिसले. त्यानंतर दोघांमध्ये प्रेम वाढलं. दोघांनी जंजीर, अभिमान, छुपके-छुपके आणि शोलेमध्ये एकत्र काम केलं. या दोघांनीही 3 जून 1973 मध्ये लग्न केलं. दोघांना अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन ही दोन मुले आहेत.

Follow Us
दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना
Radhakrishna Vikhe-Patil : दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना मिळणार पाणी; विखे पाटलांनी सांगितलं संपूर्ण नियोजन
नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुली
Nanded : दादागिरी नाही चालणार! नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुलीविरोधात शेतकरी संघटना आक्रमक
सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
Sunetra Pawar Meeting : NCP : सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
राष्ट्रवादीत मोठी खदखद, शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची
NCP Leader Meet Amit Shah : राष्ट्रवादीत मोठी खदखद, अमित शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची तक्रार? पार्थ आणि सुनेत्रा पवारांच्या भूमिकेवर नाराजी
बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
Devendra Fadnavis : काँग्रेसने बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला....
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला लगावत नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस....
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस पूर्ण विश्रांतीचा सल्ला
तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाह...
Amit Shah : तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाहांचा निर्धार
सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवल
Sangali : सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवलं
दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत.....
Sanjay Ghadi On BJP : दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत मतभेद