AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahalaxmi Express: मुंबई ते कोल्हापूर जाताना महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये लुटमार,गाढ झोपेत असताना महिलांचे दागिने हिसकावले…

Mahalaxmi Express Robbery: मुंबईहून कोल्हापूरला जात असलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये रविवारी मध्यरात्री लुटमारीची घटना घडली आहे. चोरांनी रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड घडवून ही चोरी केल्याचे म्हटले जात आहे.

Mahalaxmi Express: मुंबई ते कोल्हापूर जाताना महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये लुटमार,गाढ झोपेत असताना महिलांचे दागिने हिसकावले...
mahalaxmi express robbery
| Updated on: Nov 02, 2026 | 10:50 PM
Share

मुंबईहून कोल्हापूरला जाणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये रविवारी रात्री दरोडा पडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दरोडेखोरांनी सिग्नल सिस्टीममध्ये गडबड करत प्रवाशांना लुटल्याचे उघड झाले आहे. घटनेवेळी प्रवासी गाढ झोपेत असताना याचा फायदा घेत चोरट्यांनी आपला हात साफ केला. माहितीनुसार जेव्हा ट्रेन लोणंद-सालपाच्या दरम्यान होती, तेव्हा दरोडेखोरांनी सिग्नल यंत्रणेत व्यत्यय आणला. त्यानंतर ट्रेनच्या खिडकीतून काही महिलांचे दागिने हिसकावले.

हा दरोडा एस-१ आणि एस-३ कोचच्या खिडक्यात झाला. मध्यरात्री झालेल्या या घटनेने प्रवासी प्रचंड घाबरले. अशा प्रकारे रेल्वेची सिग्नल यंत्रणा चोरट्यांनी कशी काय बाधित केली, रेल्वेचे सुरक्षा बल काय करत होते असा सवाल या घटनेने निर्माण झाला आहे. या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत कांजूरमार्गचे रहिवासी सुनिता गोरक्षनाथ तुपे ( ४४ ) आणि रायगड जिल्ह्यातील रहिवासी सुरेखा बाबासाहेब खाडे ( ४० ) यांना टार्गेट केले गेले. दोन्ही महिला ट्रेनच्या एस-१ या आरक्षित कोचमधून प्रवास करत होत्या. तक्रारीनुसार ट्रेन थांबल्यानंतर दोन अज्ञात व्यक्ती कोचच्या खिडक्याजवळ आले आणि त्यांनी दोन्ही महिलांच्या सोन्याचे दागिने खेचून पलायन केले. हे चोरटे डब्यात शिरले नव्हते त्यांनी बाहेरुनच सोन्याचे दागिने खेचून पलायन केले.

मिरज रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सीताराम फांद यांनी दिलेल्या माहितीनुसार चोरी झालेल्या सोन्याचे वजन १ ते दीड तोळे असल्याचा अंदाज आहे. पोलिसांना संशय आहे की एका व्यक्तीच्या खांद्यावर अन्य एका व्यक्तीने चढून खिडकीतून चेन खेचली असावी. सिग्नलची तार तोडून ट्रेन थांबवल्याच्या आरोपाची देखील चौकशी केली जात आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेची चिंता

मुंबई ते कोल्हापूर दरम्यान धावणारी महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत असतात. त्यामुळे अशा ट्रेनमध्ये अशा प्रकारचे लुटमारीची घटना घडल्याने प्रवाशांच्या सुरक्षेची चिंता व्यक्त केली जात आहे. घटनेत प्रवाशांना टार्गेट केले गेले आहे. किती संपत्ती लुटली आणि सिग्नल सिस्टीममध्ये कशा प्रकारे गडबड केली गेली याची माहिती पूर्णपणे मिळालेली नाही. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. रेल्वे प्रवाशांच्या तक्रारीनुसार एफआयआर दाखल केली जात आहे.

Follow Us
दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना
Radhakrishna Vikhe-Patil : दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना मिळणार पाणी; विखे पाटलांनी सांगितलं संपूर्ण नियोजन
नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुली
Nanded : दादागिरी नाही चालणार! नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुलीविरोधात शेतकरी संघटना आक्रमक
सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
Sunetra Pawar Meeting : NCP : सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
राष्ट्रवादीत मोठी खदखद, शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची
NCP Leader Meet Amit Shah : राष्ट्रवादीत मोठी खदखद, अमित शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची तक्रार? पार्थ आणि सुनेत्रा पवारांच्या भूमिकेवर नाराजी
बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
Devendra Fadnavis : काँग्रेसने बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला....
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला लगावत नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस....
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस पूर्ण विश्रांतीचा सल्ला
तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाह...
Amit Shah : तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाहांचा निर्धार
सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवल
Sangali : सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवलं
दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत.....
Sanjay Ghadi On BJP : दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत मतभेद