AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अख्ख्या देशात जाळपोळ, दगडफेक, हिंसा… लोक रस्त्यावर उतरले, 500 कारखाने बंद; बांगलादेशात आग ही आग

बांगलादेशात कापड कामगारांनी किमान वेतन वाढीच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन पुकारले आहे. सध्याच्या 12 हजार टका मजुरीत वाढीव महागाईमुळे गुजराण करणे अशक्य झाल्याने त्यांनी 30 हजार टका मजुरीची मागणी केली आहे. 31 ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे अनेक कारखाने बंद पडले असून, ढाका परिसरातील रस्ते जाम झाले आहेत. काही ठिकाणी हिंसाचार व पोलीस कारवाई देखील झाली आहे.

अख्ख्या देशात जाळपोळ, दगडफेक, हिंसा... लोक रस्त्यावर उतरले, 500 कारखाने बंद; बांगलादेशात आग ही आग
Bangladesh Garment Workers ProtestImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 02, 2026 | 3:59 PM
Share

आपल्या शेजारीच असलेल्या बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसा भडकली आहे. तब्बल 28 महिन्यानंतर पुन्हा एकदा लोक रस्त्यावर उतरले आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ले होत आहेत. जाळपोळ सुरू आहे. दगडफेक केली जात आहे. देशातील अनेक रस्ते बंद आहेत. सत्ता परिवर्तन घडवून आणण्यासाठी हे आंदोलन होत नाहीये. तर मजुरी कमी मिळत असल्याने लोक रस्त्यावर उतरले आहेत. मजुरी वाढवण्याची त्यांची मागणी आहे. त्यामुळे बांगलादेशातील कापड कारखान्यातील मजूर रस्त्यावर उतरले आहेत. यापूर्वी जुलै 2024 मध्ये बांगलादेशात शेख हसीना यांच्या विरोधात आंदोलन झालं होतं.

31 ऑक्टोबरपासून हे आंदोलन सुरू आहे. या मजुरांनी ढाका (मीरपूर), आशुलिया, सावर, गाजीपूर सारख्या औद्योगिक परिसरातील रस्ते जाम केले आहेत. गार्मेंट फॅक्ट्र्या बंद केल्या आहेत. कामगारांच्या या आंदोलनामुळे आणि संपामुळे सुमारे 529 कारखाने आणि कमीत कमी 10 लाख श्रमिकांवर त्याचा परिणाम झाला आहे. काही ठिकाणी हिंसा, जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. पाण्याचे फव्वारे चालवावे लागले. साऊंड ग्रेनेडचा वापर करावा लागला. काही परिसरात तर BGB तैनात करण्यात आली आहे.

तिसऱ्या दिवशीही…

आज तिसऱ्या दिवशी बांगलादेश पूर्वपदावर येईल अशी परिस्थिती होती. पण आज तसं काही घडलं नाही. उलट आज अधिक प्रमाणात कामगार रस्त्यावर आले. या कामगारांनी ढाकाच्या मीरपूरच्या अनेक गल्ल्यांमध्ये जाऊन निदर्शने केली. अजूनही असंख्य कामगार रस्त्यावर आहेत. अनेक ठिकाणी पोलीस आणि कामगारांमध्ये धुमश्चक्री उडाली आहे.

सकाळीच रस्त्यावर आले

बांगलादेशचे वृत्तपत्र प्रथम आलोने याबाबतचं वृत्त दिलं आहे. आज सोमवारी सकाळी जवळपास 10:45 वाजता, मीरपूर-10च्या सेनपारा परबटा परिसरात काही मजदूर एका गल्लीतून निगून मुख्य रस्त्यावर येण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. त्यानंतर मीरपूर-2 मध्ये स्टेडियमच्या जवळ प्रोशिका चौकातही कामगारांनी रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना तिथून हुसकावून लावलं, असं वृत्त प्रथम आलोने दिलं आहे.

12 हजार टकामध्ये गुजराण

बांगलादेशातील कापड कामगार कमीत कमी 30000 टका मजुरी मागत आहेत. सध्या त्यांना 12 हजार टका मिळत आहेत. महागाई वाढली आहे. जेवण, घर भाडं, गाडी खर्च आणि आरोग्यावरचा खर्चा वाढला आहे. त्यामुळे आमची क्रयशक्ती कमी झाली आहे. सध्याच्या पगारात कुटुंब चालवणं कठिण झालं आहे, असं या कामगारांचं म्हणणं आहे. बांगलादेश गार्मेंट सेक्टरमध्ये जगातील सर्वात कमी मजुरी दिली जाते.

Follow Us
दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत.....
Sanjay Ghadi On BJP : दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत मतभेद
दिया मिर्झाने हिंदूंना दिवाळी कशी साजरी करावी हे शिकवू नये...
Ritu Tawde on Dia Mirza : दिया मिर्झाने हिंदूंना दिवाळी कशी साजरी करावी हे शिकवू नये; दिया मिर्झाच्या त्या व्हिडीओवरून महापौर आक्रमक
माझ्याकडे सर्वांचा सातबारा आहे...; रवींद्र धंगेकरांचा रोख कोणाकडे?
Ravindra Dhangekar : माझ्याकडे सर्वांचा सातबारा आहे...; रवींद्र धंगेकरांचा रोख नेमका कोणाकडे?
गोकुळ अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा! कोर्टाचे आदेश काय? 25 संचालकांची...
गोकुळ अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा! कोर्टाचे आदेश काय? 25 संचालकांची महत्त्वपूर्ण सभा अन्...
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 5 हजारांची अग्रिम मदत खात्यात....
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 5 हजारांची अग्रिम मदत खात्यात जमा होण्यास सुरुवात
वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; कमरेला....
Walmik Karad : वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; कमरेला पिस्तूल लावलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
ॲपवर मैत्री करणं पडलं महागात! व्हिडीओच्या आधारे बीडच्या व्यापाऱ्याला..
Beed : ॲपवर मैत्री करणं पडलं महागात! खासगी व्हिडीओच्या आधारे बीडच्या व्यापाऱ्याला तब्बल एवढ्या लाखांचा गंडा
राष्ट्रवादीच्या नेत्यांची अमित शाहांशी रात्री उशिरा भेट; राजकीय चर्चां
राष्ट्रवादीच्या नेत्यांची अमित शाहांशी रात्री उशिरा भेट; राजकीय चर्चांना उधाण
दिया मिर्झाचा दिवाळी व्हिडिओ पालिकेने हटवला; अमित साटम यांचा आक्षेप
दिया मिर्झाचा दिवाळी व्हिडिओ पालिकेने हटवला; अमित साटम यांच्या आक्षेपानंतर काय घडलं?
दिवाळीच्या सेलिब्रिटी कॅम्पेनवरुन पालिकेत वादाची शक्यता, दिया मिर्झा..
Mumbai BMC : दिवाळीच्या सेलिब्रिटी कॅम्पेनवरुन पालिकेत वादाची ठिणगी