जगात उडणार हाहाकार! जगाला ज्याची भीती तोच निर्णय घेण्याच्या तयारीत अमेरिका, थेट..
इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढला आहे. दोन्ही देशातील तणाव आता भयंकर स्थितीत पोहोचला आहे. त्यात आता अमेरिका इराणविरोधात मोठे पाऊले उचलण्याच्या तयारीत असल्याचे बघायला मिळतंय. यादरम्यानच धक्कादायक घडामोडी घडताना दिसत आहेत.

इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव पुन्हा एकदा वाढल्याचे बघायला मिळत आहे. त्यातच आता इराणविरोधात अमेरिका परमाणू हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जातंय. काही दिवसात अमेरिका हे पाऊल उचलून शकते, असे संकेत आहेत. अमेरिका वारंवार इराणविरोधात मोठ्या कारवाईचे संकेत देत आहे. इस्त्रायलच्या निवडणुकीत पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू बहुमत सिद्ध करू शकले नाही. नेतन्याहू अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. इस्त्रायलचे पंतप्रधान हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत प्रशासनावर इराणवर परमाणु हल्ला करण्यासाठी दबाव टाकत आहेत. डोनाल्ड ट्रम्प कधीही इराणवर परमाणु हल्ला करू शकतात, तश्या घडामोडी घडताना दिसत आहेत. कार्लसने यांनी लिहिले की, इस्त्रायली गुप्त एजन्सीने दावा केला की, इराण सरकारने न्यूक्लियर प्रोग्राम सुरू केला आहे.
अमेरिकेचे कोणतेही शस्त्र 300 फुट खालील सुरंगा स्फोट करू शकत नाहीत. इराणचा परमाणु प्रोग्राम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. नेतन्याहू खूप जास्त चिंतेत आहेत. मागच्या आठवड्यात झालेल्या निवडणुकीत सरकार तयार करणे त्यांना शक्य झाले नाही. कार्लसनने म्हटले की, रक्षा मंत्री हेगसेथ आणि सेंटकॉम कमांडर ब्रॅड कूपरसोबत जवळच्यांवर दबाव टाकत आहेत.
अमेरिका कोणत्याही क्षणी इराणविरोधात मोठे पाऊल उचलू शकते. कार्लसनने भारत पाकिस्तानचे नाव देखील लिहिले. त्यांनी म्हटले की, अमेरिकेने युद्धात कधीच परमाणूची मदत घेतली नाही. अमेरिकेने जर इराणवर हल्ला केला तर नवीन गोष्ट होईल. रशियाने अगोदरच स्पष्ट केले की, जर इराणवर अमेरिकेने हल्ला केला तर आम्हालाही युक्रेनबद्दल मोकळीक मिळेल.
भारत, पाकिस्तान, उत्तर कोरिया यारखे देशही यावर विचार करू शकतात. पुढच्या आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल निर्णय घेऊ शकतात, असे सांगितले जाते. याकडे जगाच्या नजरा आहेत. घडामोडींना मोठा वेग आल्याचे बघायला मिळत आहे. रशिया या युद्धात इराणला मदत करत असल्याचे सांगितले जात आहे. रशियाचे प्रत्येक बारीक घडामोडींवर लक्ष आहे.
