महाराष्ट्रात मोठी खळबळ! सर्व कोर्टांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी, तडकाफडकी…घडामोडी वाढल्या
राज्यातील सर्वच न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. सर्वच जिल्हा व सत्र न्यायालयांना उडवून देण्याची धमकी देण्यात आलीय.

Court Bomb Blast Threat : राज्यातील सर्वच न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. सर्वच जिल्हा व सत्र न्यायालयांना उडवून देण्याची धमकी देण्यात आलीय. ही धमकी मिळाल्यानंतर प्रशासन तसेच पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. संपूर्ण राज्यातील कोर्टांनाच ही धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही धमकी नेमकी कोणी दिली याची सध्या नेमकी माहिती समोर आलेली नाही.
सर्वच न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी
काही दिवसांपूर्वी अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर गर्दीच्या ठिकाणी मुंबईत गोळीबार करण्यात आला. यात त्याचा ड्रायव्हर जखमी झाला. या घटनेमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. असे असतानाच आता राज्यातील सर्वच न्यायालयाने बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
संभाजीनगरात न्यायालय रिकामे करण्याचा आदेश
राज्यातील सर्वच जिल्हा व सत्र न्यायालयांना बॉम्बने उडवून देऊ अशा धमकीचा मेल आला आहे. हा मेल प्राप्त होताच यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापुरातील कोर्टांना उडवून देण्याची धमकी आली आहे. जिल्हा व सत्र न्यायालयांचा यात समावेश आहे. हा मेल मिळताच छत्रपती संभाजीनगरातील जिल्हा न्यायालयाची संपूर्ण इमारत खाली करण्याचा आदेश दिला आहे. या भागात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. संपूर्ण वकील, न्यायालयीन कर्मचारी इमारतीतून बाहेर पडले आहेत.
अनुचित प्रकार घडू नये म्हणून घेतली जातेय खबरदारी
पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. न्यायलयांमध्ये आयईडी बॉम्बस्फोट घडवून आणू अशी धमकी देणारा मेल आला होता. हा मेल मिळताच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खरबदारी घेतली जात आहे. दुपारी 3 वाजून 11 मिनिटांनी हा मेल आला आहे. दरम्यान, धमकीचा मेल आल्यानंतर आता हा मेल नेमका कोणी केला, याची चौकशी सुरु करण्यात आली आहे. आम्ही सर्व बाजूने खबरदारी घेत आहोत, असे पोलिसांनी सांगितले आहे.
