दिवाळी 2025
मंत्र
॥ॐ श्री महालक्ष्म्यै च विद्महे विष्णु पत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॐ॥
अर्थ- "ओम, आपण महान देवी महालक्ष्मीचं ध्यान करतो. आपण भगवान विष्णूच्या पत्नीचं ध्यान करतो. त्या लक्ष्मीने आपल्याला प्रेरित आणि प्रबुद्ध कराावं. ओम. या मंत्राचा उच्चार माता लक्ष्मीचा आशीर्वाद, मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळण्यासाठी केला जातो. त्यासोबतच याचा उच्चार मातेचं धन, समृद्धी आणि दैवी कृपाच्या गुणांचं आवाहन करण्यासाठी केला जातो.
Articles
Gallery
लाडू ते काजूकतली.. कोणती मिठाई किती दिवसांपर्यंत खाण्यालायक असते?
6 Images
'महाराष्ट्राची हास्यजत्रे'च्या कलाकारांची वृद्धाश्रमात अनोखी दिवाळी
5 Images
26 लाख दिव्यांनी उजळला शरयू घाट, पहा अयोध्येतील दीपोत्सवाचे PHOTO
5 Images
नरक चतुर्दशीच्या दिवशी 'हे' फळ पायाच्या अंगठ्याने का फोडतात?
5 Images
धनत्रयोदशीला धनाची पूजा करताय तर थांबा..., जाणून घ्या सत्य
5 Images
दिवाळीत दारात काढा सोप्या आणि आकर्षक रांगोळ्या, दारात दिसतील शोभून
5 Images
दिवाळीपर्यंत वाट पहा, 'या' 5 राशींचे नशीब उजळणार
5 ImagesLatest News
दिवाळी आणि लक्ष्मी-गणेश पूजन
सनातन धर्मातील सर्वात पवित्र आणि महत्त्वाच्या सणांपैकी दिवाळी एक आहे. या सणामध्ये केवळ धनाची देवी महालक्ष्मी यांची पूजाच नव्हे, तर धन्वंतरी, कुबेर आणि यमराज यांचीही पूजा केली जाते. विशेषतः अकाल मृत्यू टाळण्यासाठी यमपूजनाचेही महत्त्व आहे.
दिवाळी सर्वप्रथम केव्हा आणि का साजरी झाली याचे ठोस उत्तर नसले, तरी स्कंद पुराण, पद्म पुराण, श्रीमद भागवत, आणि मनुस्मृती यांसारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये दिवाळीचा महिमा, पूजेची पद्धत आणि तिचे फायदे यांचे अनेक उल्लेख आढळतात.
समुद्र मंथन आणि दिवाळीचा संबंध
वाल्मिकी रामायणनुसार, भगवान रामचंद्र लंकेवर विजय मिळवून कार्तिक अमावस्येच्या दिवशी अयोध्येत परतले. त्यांचं आगमन होण्यापूर्वी हनुमानाच्या माध्यमातून त्यांनी भरताला संदेश पाठवला. भरताने संपूर्ण अयोध्येला दीपांनी, तोरणांनी आणि सजावटींनी सजवण्याचे आदेश दिले. अयोध्यावासीयांनी या स्वागतात भरभरून आनंद साजरा केला आणि दिव्यांनी सारा नगर प्रकाशमान केला.
स्कंद पुराण व शिव पुराण यांनुसार, समुद्र मंथनामधून धन्वंतरी देव अमृत कलशासह प्रकट झाले. त्यांचं पूजन दिवाळीच्या आदल्या दिवशी केलं जातं. याच समुद्र मंथनातून महालक्ष्मी देवी प्रकट झाल्या, आणि त्यांनी भगवान विष्णू यांना पती म्हणून स्वीकारलं. त्यामुळे दिवाळीच्या मुख्य दिवशी लक्ष्मीपूजनाचा प्रघात आहे.
भविष्य पुराणातील कथेनुसार, भगवान विष्णूंनी भक्त राजा बळी यांना सुतल लोकाचे राज्य दिले. राजा बळी दिवाळीच्या दिवशी तिकडे गेले आणि तिथे दीपोत्सव साजरा केला. स्कंद पुराण, पद्म पुराण, आणि भविष्य पुराण या तिन्ही ग्रंथांमध्ये दिव्यांची आरास, दीपमाला आणि दीपवृक्षांची चर्चा होते.
दिवाळीचा कृषिप्रधान दृष्टीकोन
भारत हा कृषिप्रधान देश असून दिवाळीच्या सुमारास खरीप पीक कापणीचे काम पूर्ण होते. त्यामुळे शेतकरी कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण असते. नवीन पीक घरात येते, आणि पुढील हंगामाची तयारी सुरू होते. याच अनुषंगाने दिवाळी साजरी केली जाते.
तसेच, पावसाळ्यानंतर कीटकांचा उपद्रव वाढतो. दिव्यांचे प्रकाश आणि उष्णता यामुळे हे कीटक आकर्षित होऊन नष्ट होतात. ही प्रथाही दिवाळीच्या साजरीकरणामागे आहे.
दिवाळीबाबतचे सामान्य प्रश्न (FAQ)
-
when is deepawali?: दिवाळी 2025 मध्ये केव्हा आहे?
दिवाळी अमावस्येला साजरी केली जाते. यावेळी दिवाळी हिंदू पंचागा नुसार 20 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे 03 वाजून 44 मिनिटाने सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 21 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे 05 वाजून 54 मिनिटाने संपेल.
-
Laxmi Puja Muhurat 2025: पूजेचा मुहूर्त काय आहे?
दिवाळीच्या दिवशी माँ लक्ष्मी आणि भगवान गणेशाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 7 वाजून 8 मिनिटापासून ते 8 वाजून 18 मिनिटापर्यंत आहे.
-
Laxmi Puja Bhog: दिवाळीत लक्ष्मी मातेला काय भोग लावावा?
मुरमुरे, बताशांसोबत देवीला लाडूचा भोग दिला जातो.
-
दिवाळीला प्रकाश पर्व का म्हटलं जातं?
दिवाळी अंधकारावर प्रकाशाचा विजय दर्शवते. हे अज्ञानावर ज्ञानाचा, आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवणारे पर्व आहे. म्हणूनच हिला प्रकाश उत्सव म्हणतात. दिव्यांनी घरातील व आजूबाजूच्या अंधाराचा नाश होतो आणि समृद्धी, सकारात्मकता येते.
-
लक्ष्मी पूजनाचे महत्त्व काय आहे?
महालक्ष्मी या धन, ऐश्वर्य व समृद्धीच्या देवी आहेत. दिवाळीच्या दिवशी त्यांची पूजा केल्याने घरात लक्ष्मीचे आगमन होते अशी श्रद्धा आहे. म्हणून लोक घराची साफसफाई, सजावट करून लक्ष्मी देवीचे स्वागत करतात.