AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video : कर्मचाऱ्यांना राग अनावर, सोनपापडीचे बॉक्स गेटवरच फेकले; बोनस न दिल्याने….

सध्या देशभरात दीपावलीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सध्या एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत कर्मचाऱ्यांनी कंपनीने दिलेले सोनपापडीचे बॉक्स गेटवर टाकून दिले आहेत.

Viral Video : कर्मचाऱ्यांना राग अनावर, सोनपापडीचे बॉक्स गेटवरच फेकले; बोनस न दिल्याने....
diwali soan papdi boxes
| Updated on: Oct 21, 2025 | 9:03 PM
Share

सध्या दिवाळीची सगळीकडे धूम आहे. या सणानिमित्त घरोघरी गोड-धोड पदार्थ बनवले जातात. शेजारी, नातेवाईकांना गोड पदार्थ भेट म्हणून दिले जाते. याच उत्सवात आजकाल कंपन्यादेखील सहभागी होत आहेत. अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या वस्तू भेट म्हणून देतात. काही कंपन्या मिठाईचे वाटप करतात. दरम्यान, सध्या एका कंपनीने दिवाळीची भेट म्हणून सोनपापडीचे बॉक्स दिल्याने कर्मचाऱ्यांनी हेच बॉक्स थेट कंपनीच्या गेटवर फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

नेमका काय प्रकार घडला?

सध्या समोर आलेला प्रकार नेमका कुठला आहे, हे समजू शकलेले नाही. मात्र कर्मचाऱ्यांनी रागात सोनपापडीचे बॉक्स कंपनीच्या गेटवर फेकून दिले आहेत. अनेक कंपन्या दिवाळीनिमित्त आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस देतात. हे बोनस कधी-कधी कर्मचाऱ्यांच्या पगाराएवढेच असते. एका कंपनीने मात्र कर्मचाऱ्यांना बोनस तर दिलेच नाही. परंतु या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना बोनसऐवजी सोनपापडीचे बॉक्स वाटले. याचाच राग कर्मचाऱ्यांना आला.

कर्मचाऱ्यांनी सोनपापडीचे बॉक्स थेट फेकून दिले

या कर्मचाऱ्यांनी आपल्या कंपनीने भेट म्हणून दिलेले हे सोनपापडीचे बॉक्स नंतर गेटसमोर फेकून दिले आहेत. काही कर्मचाऱ्यांनी तर हे बॉक्स गेटच्या मध्ये टाकले आहेत. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ पाहून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. काही नेटकरी अन्नाचा अपमान करू नये, असे म्हणत कर्मचाऱ्यांचे कृत्य चुकीचे आहे, अशा भावना व्यक्त केल्या आहेत. तर काही लोकांनी नो गिफ्ट पॉलिसिअंतर्गत आमची कंपनी तर आम्हाला काहीच देत नाही. त्यामुळे सोनपापडीचे बॉक्स मिळणे हीदेखील काही लहान बाब नाही, असे काही नेटकरी म्हणाले आहेत. काही नेटकऱ्यांनी मात्र या कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला आहे. अनेक कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांची पिळवणूक केली जाते. सणासुदीच्या काळात अशा प्रकारची भेट देऊन कर्मचाऱ्यांची हेटाळणी करण्यात आली आहे, असे मत काही नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे. एक्स या समाजमाध्यमावर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.