Gas Cylinder Rate | गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
राज्यभरात गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली असून नवे दर आजपासून लागू झाले आहेत. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत तब्बल 60 रुपयांची वाढ झाली आहे, तर 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 115 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा या दरवाढीवर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे.
राज्यभरात गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली असून नवे दर आजपासून लागू झाले आहेत. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत तब्बल 60 रुपयांची वाढ झाली आहे, तर 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 115 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा या दरवाढीवर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. अमेरिका, इराण आणि इस्त्रायल यांच्यात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला असून त्यामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मागणी वाढल्याने गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या दरवाढीमुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, वाढलेल्या गॅस दरांचा सर्वाधिक परिणाम सामान्य ग्राहकांवर होत असून त्याचा भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागत आहे.
Published on: Mar 07, 2026 12:35 PM
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi

