Iran – Israel War | युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
इराण आणि इस्त्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता भारतातील बंदरांवरही दिसू लागला आहे. Jawaharlal Nehru Port Authority (JNPA) बंदरावर मोठ्या प्रमाणात कंटेनर अडकून पडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बंदरावर एकूण ४,१९२ कंटेनर अडकले असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नाशवंत माल आहे. युद्धामुळे काही शिपिंग मार्गांवर परिणाम झाला असून अनेक शिपिंग सेवा तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत.
इराण आणि इस्त्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता भारतातील बंदरांवरही दिसू लागला आहे. Jawaharlal Nehru Port Authority (JNPA) बंदरावर मोठ्या प्रमाणात कंटेनर अडकून पडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बंदरावर एकूण ४,१९२ कंटेनर अडकले असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नाशवंत माल आहे. युद्धामुळे काही शिपिंग मार्गांवर परिणाम झाला असून अनेक शिपिंग सेवा तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत. तसेच काही शिपिंग कंपन्यांनी माल वाहतुकीसाठी नकार दिल्यानेही परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. त्यामुळे निर्यात आणि आयात प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले आहेत. अडकलेल्या कंटेनरपैकी सुमारे १,५०० कंटेनरमध्ये नाशवंत पदार्थ असल्याची माहिती समोर आली आहे. या कंटेनरमध्ये मासे, मांस आणि फळे यांसारखा लवकर खराब होणारा माल भरलेला आहे. माल वेळेत पोहोचला नाही तर व्यापाऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. दरम्यान, बंदर प्रशासन आणि संबंधित यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. शिपिंग सेवा सुरळीत झाल्यानंतर अडकलेले कंटेनर लवकरात लवकर मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Published on: Mar 07, 2026 04:59 PM
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..

