NCP | शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त, राज्यसभेच्या अर्जातील प्रतिज्ञापत्रातून उघड
महाराष्ट्रात राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक जोरात सुरू आहे. महाविकास आघाडी कडून एक आणि महायुती कडून सहा उमेदवार मैदानात आहेत. या निवडणुकीत पवार कुटुंबाचे दोन सदस्यही उतरले आहेत. नुकतेच दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांमध्ये पार्थ पवार यांची मालमत्ता त्यांच्या आजोबा शरद पवार पेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्रात राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक जोरात सुरू आहे. महाविकास आघाडी कडून एक आणि महायुती कडून सहा उमेदवार मैदानात आहेत. या निवडणुकीत पवार कुटुंबाचे दोन सदस्यही उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार महाविकास आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत, तर अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार सुनेत्रा पवार यांच्याऐवजी महायुतीकडून राज्यसभेसाठी उभे आहेत.
नुकतेच दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांमध्ये पार्थ पवार यांची मालमत्ता त्यांच्या आजोबा शरद पवार पेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे. शरद पवार आणि पत्नी प्रतिभा पवार यांची एकूण मालमत्ता सुमारे ६०.७१ कोटी आहे, तर पार्थ पवार यांची मालमत्ता ८८.३३ कोटी इतकी आहे. पार्थ पवारांकडे जंगम आणि स्थावर मालमत्ता, शेती, पुण्यातील घर, बँक ठेवी, समभाग आणि सोने-चांदीसहित विविध गुंतवणुकी आहेत. त्यांच्या मालमत्तीतून दिसते की ते आजोबांपेक्षा जवळपास २७-२८ कोटी रुपयांनी अधिक श्रीमंत आहेत. या निवडणुकीत पवार कुटुंबाचे दोन पिढ्यांचे प्रतिनिधित्व, त्यांची आर्थिक स्थिती आणि राजकीय स्पर्धा यामुळे चर्चा आहे. निकाल लवकरच जाहीर होणार असून सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे.
Published on: Mar 07, 2026 03:50 PM
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा

