AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Buldhana | बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का, स्थानिक काँग्रेस नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Buldhana | बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का, स्थानिक काँग्रेस नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

| Updated on: Mar 07, 2026 | 6:41 PM
Share

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी पक्षांतर केल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. निवडणुका संपल्यानंतरही हे पक्षांतर सुरूच असून विरोधी पक्षातील काही नेते सत्ताधारी पक्षात प्रवेश करत आहेत. याच पार्श्वभूमीवर चिखली विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी पक्षांतर केल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. निवडणुका संपल्यानंतरही हे पक्षांतर सुरूच असून विरोधी पक्षातील काही नेते सत्ताधारी पक्षात प्रवेश करत आहेत. याच पार्श्वभूमीवर चिखली विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या भागातील काँग्रेसचे अनेक स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात हा प्रवेश पार पडला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि आमदार श्वेता महाले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी माजी नगराध्यक्ष आणि चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती नंदू सवडतकर, काँग्रेस नेते गुलाबराव सपकाळ, काँग्रेसचे चिखली शहराध्यक्ष राहुल सवडतकर, पंचायत समितीचे माजी सभापती अरविंद देशमुख, किसान काँग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद पालवे, युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अमोल काकडे, शेलोडीचे माजी सरपंच दिलीप नरवाडे, शिवव्याख्याते संतोष गवारे पाटील तसेच विशाल सवडतकर आणि प्रदीप सवडतकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. या पक्षप्रवेशामुळे बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची चर्चा सध्या सुरू आहे.

Published on: Mar 07, 2026 06:41 PM
Follow Us