दिवाळीमध्ये शिवलिंगावर ‘या’ वस्तू करा अर्पण, भगवान शंकर प्रसन्न होताच सर्व दुःख होतील दूर
दिवाळी हा सण खूप शुभ मानला जातो. या खास प्रसंगी, धनाची देवी लक्ष्मीदेवी आणि भगवान गणेश यांची पूजा केली जाते. अशातच तुम्ही दिवाळीत शिवलिंगावर जर या गोष्टी अर्पण केल्या तर तुमची सर्व दु:ख दूर होतील.

दिवाळीचा सण हा कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी सुरू होतो. त्यात दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी लक्ष्मी देवी आणि विघ्नहर्ता गणपती बाप्पाची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि आपल्या जीवनात आनंद आणि शांती मिळते. तर दिवाळीच्या या शुभ दिवशी शिवलिंगावर अभिषेक करणे शुभ मानले जाते.
दिवाळीच्या या शुभ दिवसांमध्ये जर तुम्हालाही महादेवाचा आशीर्वाद घ्यायचा असेल , तर सकाळी स्नान केल्यानंतर शिवलिंगाचा अभिषेक करा. असे मानले जाते की या विधीमुळे महादेवाच्या आशीर्वादाने समस्या दूर होतात. चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊयात दिवाळीत शिवलिंगाचा अभिषेक करताना कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात.
मानसिक ताण दूर होईल
मानसिक ताण कमी करण्यासाठी दिवाळीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर गंगाजल किंवा दुधाने अभिषेक करा. असे मानले जाते की हा उपाय मानसिक ताण कमी करतो आणि भगवान शंकर यांच्या आशीर्वादाने जीवनात आनंद आणि शांती निर्माण होते.
समस्या दुर होऊन अडकलेली कामे पूर्ण होतील
दिवाळीच्या दिवशी शिवलिंगाला पांढरे फुले अर्पण करा आणि शंकर महादेवांच्या मंत्रांचा जप करा. धार्मिक श्रद्धेनुसार हे उपाय तुमच्या जीवनात आनंद आणि शांती आणते. शिवाय महादेवाच्या कृपेने तुमच्या जीवनात उद्भवणाऱ्या कोणत्याही समस्या दूर होतील तसेच अडकून राहीलेली कामे पुर्ण होतील.
आर्थिक अडचणी दूर होतील
तुम्हाला जर आर्थिक अडचणी येत असतील तर दिवाळीच्या दिवशी शिवलिंगावर तांदूळ अर्पण करा. असा विश्वास आहे की या उपायाने आर्थिक समस्या दूर होण्यास आणि आर्थिक लाभ होण्यास मदत होते.
संतान प्राप्तीचे सुख मिळेल
संतती प्राप्तीसाठी शिवलिंगावर गहू अर्पण करा. धार्मिक श्रद्धेनुसार हा उपाय घरात व तुमच्या जीवनात सुख आणि समृद्धी आणते असे मानले जाते.
दिवाळी कधी आहे (दिवाळी २०२५ तारीख)
वैदिक कॅलेंडरनुसार कार्तिक महिन्यातील अमावस्येची तारीख 20 ऑक्टोबर रोजी पहाटे 3 वाजून 44 मिनिटांनी सुरू होईल. ते 21 ऑक्टोबर रोजी पहाटे 5 वाजून 54 मिनिटांनी अमावस्या संपेल. त्यामुळे दिवाळी 20 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
