AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

3 हजारांहून अधिक पुस्तकं वाचली… कोण आहे हा 5 वर्षांचा चिमुकला, ज्याच्या IQ ने सर्वांनाच केलं थक्क?

Arjun Prajapati : भारतीय वंशाच्या अर्जुन नावाच्या 5 वर्षांच्या मुलाचा IQ 141 आहे. त्याने 3000 पेक्षा अधिक पुस्तके वाचली आहेत. त्याला ब्लॅक होल आणि ह्युमन जेनेटिक्स मध्ये रस आहे. अर्जुनची जिज्ञासा त्याच्या वयापेक्षा खूप जास्त आहे.

3 हजारांहून अधिक पुस्तकं वाचली... कोण आहे हा 5 वर्षांचा चिमुकला, ज्याच्या IQ ने सर्वांनाच केलं थक्क?
| Edited By: | Updated on: Oct 24, 2026 | 9:53 AM
Share

जगात अशी अनेक मुले आहेत ज्यांना ‘गॉड गिफ्टेड’ मानले जाते, कारण ती आपली बुद्धिमत्ता आणि क्षमता वापरून अशा गोष्टी साध्य करतात ज्या प्रौढांनाही जमत नाहीत. पाच वर्षांचा अर्जुन प्रजापती हा असाच एक मुलगा आहे. त्याच्या वयाची बहुतेक मुले जेव्हा फक्त आजूबाजूच्या गोष्टींचे निरीक्षण करून त्या समजून घेत असतात, तेव्हा अर्जुन गणितातील संकल्पना, ब्लॅक होल, ह्युमन जेनेटिक्स आणि इम्यून सिस्टीम यासारख्या विषयांचा शोध घेत असतो. अर्जुनच्या पालकांच्या मते, त्याने आतापर्यंत 3000 हून अधिक पुस्तके वाचली आहेत. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित यांपासून ते मायक्रोबायोलॉजी आणि इम्युनोलॉजीपर्यंत विविध विषयांमध्ये त्याला रस आहे.

केवळ चार वर्षांचा असताना, अर्जुनने ‘मेंसा’ (Mensa) आणि ‘इंटरटेल’ (Intertel) या दोन आंतरराष्ट्रीय हाय IQ सोसायटीच्या मेंबरशिपसाठी क्वालिफाय केले होते. त्याच्या 141 च्या बुद्ध्यांकामुळे, अर्जुन प्रजापती स्टँडर्डाइज्ड कॉग्निटिव्ह असेसमेंटमध्ये 99.7th परसेंटाईलमध्ये येतो. त्याला कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्याकडून अभिनंदनाचे पत्रही मिळाले.

वयाच्या 18 महिन्यांत केली वाचनाला सुरुवात

अर्जुनचा जन्म वडोदरा येथील एका गुजराती कुटुंबात झाला. त्याचे आई-वडील कॅनडामध्ये स्थायिक झाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हा भारतीय वंशाचा मुलगा अवघ्या 18 महिन्यांचा असतानाच वाचायला लागला. पुस्तकांबद्दलचे त्याचे प्रेम इतके तीव्र आहे की, त्याचे आई-वडील त्यांच्या गाडीत नेहमी आठ ते दहा पुस्तके ठेवतात. अर्जुनचे वडील सांगतात की, तो म्हणायचा, “बाबा, मला कंटाळा आला तर काय? माझ्याकडे वाचायला किमान एक पुस्तक तरी असायला पाहिजे.”

अर्जुन जन्मापासूनच जिज्ञासू मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुनच्या वडिलांनी सांगितले की, त्याच्या जन्मानंतर लगेचच त्यांच्या लक्षात आले की अर्जुन आजूबाजूला पाहत होता, जणू काही तो आपल्या सभोवतालच्या गोष्टींचे निरीक्षण करून त्या समजून घेत होता. तेव्हा ते आपल्या पत्नीला म्हणाले, “बघ, तो किती जिज्ञासू दिसतोय.”

अर्जुन जसजसा मोठा होत गेला, तसतशी चित्र पुस्तके त्याची आवडती बनली. त्याला पुस्तकाची पाने उलटायला, आईने वाचलेले ऐकायला आणि बालगीते ऐकताना पुढे काय होईल याचा अंदाज लावायला खूप आवडायचे. संख्या आणि पॅटर्ननीही त्याचे लक्ष वेधून घेतले. लवकरच तो शब्द ओळखू लागला आणि फॅक्ट्स लक्षात ठेवू लागला. त्याला मानवी इम्यून सिस्टीममध्ये जेवढा रस होता, तेवढाच ब्लॅक होल आणि डायनासोरमध्येही होता.

आयक्यू चाचणीतून काय उघड झाले?

अर्जुनची वयाच्या चार वर्षे आणि दहा महिन्यांत फॉर्मल कॉग्निटिव असेसमेंट करण्यात आली. 11 जून, 2026 रोजीच्या डायग्नोस्टिक लेटर नुसार, स्टॅनफोर्ड-बिनेट इंटेलिजन्स स्केल्स, फिफ्थ एडिशनने त्याचा बुद्ध्यांक (IQ) 141 नोंदवला. एडिशनल असेसमेंट स्कोरमध्ये एडिशनल असेसमेंट स्कोर मध्ये 149 चा नॉनवर्बल IQ, 144 चा फ्लूइड रीजनिंग स्कोर आणि 146 चा वर्किंग मेमोरी स्कोर यांचा समावेश होतो. या चाचणीने अर्जुनच्या मानसिक कार्याला टॅलेंटेड असे सांगितले.

Follow Us
मुंबईच्या हवेत विषारी धुरक्याची चादर; AQI तब्बल....
Mumbai Air Pollution : मुंबईच्या हवेत विषारी धुरक्याची चादर; दादर चौपाटीवर दृश्यमानता घटली, AQI तब्बल....
जरांगेंना 500 कोटी देऊन कोणी उभं केलं? मंगेश ससाणेंचा खळबळजनक सवाल
Mangesh Sasane : मनोज जरांगेंना 500 कोटी देऊन कोणी उभं केलं? मंगेश ससाणेंचा खळबळजनक सवाल, नेमकं प्रकरण काय?
मनोज जरांगेंना तुम्हीच मोठं केलं ना, मग आता बाजूला का करता?
Chandrakant Khaire : मनोज जरांगेंना तुम्हीच मोठं केलं ना, मग आता बाजूला का करता? चंद्रकांत खैरेंचा रोख नेमका कोणाकडे?
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...