AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BAN vs PAK : बांगलादेश विरूद्धच्या पराभवानंतर कोचनेच पाकिस्तानची लाज काढली, काय म्हटलं?

Bangaldesh vs Pakistan 1st Odi : बांगलादेशने पाकिस्तानचा पहिल्याच एकदिवसीय सामन्यात धुव्वा उडवला. बांगलादेश विरूद्धच्या पराभवानंतर हेड कोचनेच पाकिस्तानची लाज काढली आहे. हेड कोच काय म्हणाला हे जाणून घेऊयात.

BAN vs PAK : बांगलादेश विरूद्धच्या पराभवानंतर कोचनेच पाकिस्तानची लाज काढली, काय म्हटलं?
Pakistan Head Coach Mike HessonImage Credit source: PTI And Bangladesh Cricket X Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 12, 2026 | 2:23 AM
Share

पाकिस्तान क्रिकेट टीम आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतून बाद झाल्यानंतर बांगलादेश विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेत विजयी सुरुवात करण्यात अपयशी ठरली. यजमान बांगलादेशने 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुपर 8 फेरीतून बाहेर पडलेल्या पाकिस्तानचा पहिल्याच सामन्यात 8 विकेट्सने धुव्वा उडवला. बुधवारी 11 मार्च रोजी बांगलादेशची राजधानी ढाका येथील शेरे बांगला स्टेडियममध्ये या सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. बांगलादेशने या सामन्यात पाकिस्तानर दणदणीत विजय मिळवला. बांगलादेशने या सामन्यात एकतर्फी फरकाने पाकिस्तानला लोळवलं. बांगलादेशने या विजयासह 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली. बांगलादेश विरूद्धच्या पराभवानंतर हेड कोचनेच पाकिस्तानची लाज काढली आहे. हेड कोच काय म्हणाला हे जाणून घेऊयात.

बांगलादेशने सामन्यात नाणेफेक जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या सलामी जोडीने 41 धावांची संयमी भागीदारी केली. मात्र त्यानंतर बांगलादेशच्या गोलंदाजांनी कमबॅक केलं. बांगलादेशने पाकिस्तानला झटपट झटके दिले. नाहिद राणा याने 5 विकेट्स घेत पाकिस्तानच्या फलंदाजाीचं कंबरडं मोडलं. त्यामुळे पाकिस्तानची स्थिती 9 आऊट 82 अशी स्थिती झाली. मात्र पाकिस्तानच्या जोडीने शेवटच्या विकेटसाठी 41 बॉलमध्ये 32 रन्स केल्या. बांगलादेशने अशाप्रकारे पाकिस्तानला 114 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर बांगलादेशने 209 बॉलआधी 8 विकेट्सने हा सामना जिंकला. बांगलादेशने 15.1 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 115 धावा केल्या. बांगलादेशने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी दिली.

पाकिस्तानच्या फलंदाजांच्या या निराशाजनक कामगिरीनंतर हेड कोच मायकल हेसन यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं. हेसन यांनी या दरम्यान पाकिस्तानच्या निराशाजनक बॅटिंगवर प्रतिक्रिया दिली.

मायकल हेसन काय म्हणाले?

“फलंदाजांनी फार निराशाजनक कामगिरी केली, यात काडीमात्र शंका नाही. फक्त युवा खेळाडूच नाही तर संपूर्ण संघ धारदार बॉलिंगसमोर उघडा पडला. आम्हाला लवकरच परिस्थितीत सुधारावी लागेल”, अशी प्रतिक्रिया मायकल हेसन यांनी दिली.

पाकिस्तानवर मालिका पराभवाची टांगती तलवार

दरम्यान बांगलादेशने पहिल्या विजयासह या 3 सामन्यांच्या मालिकेत आपली बाजू मजबूत केली आहे. बांगलादेशने या विजयासह मालिकेवर 1 हात ठेवला आहे.आता बांगलादेशला सलग आणि एकूण दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची मोठी संधी आहे. तर पाकिस्तानसाठी दुसरा क्रिकेट सामना हा प्रतिष्ठेचा असणार आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात सरस ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरा सामनाही ढाक्यातील शेरे ए बांगला स्टेडियमध्येच होणार आहे. हा सामना शुक्रवारी 13 मार्त रोजी खेळवण्यात येणार आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल