Thane News | वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ; विक्रेते हवालदिल
अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमधील युद्धाचा परिणाम आता भारतातील लहान उद्योगांवरही जाणवत आहे. ठाण्यातील राजमाता फेमस वडापाव विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला देखील याचा फटका बसला आहे. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे रोजच्या व्यवसायात अडचणी निर्माण झाल्या आहेत.
अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमधील युद्धाचा परिणाम आता भारतातील लहान उद्योगांवरही जाणवत आहे. ठाण्यातील राजमाता फेमस वडापाव विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला देखील याचा फटका बसला आहे. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे रोजच्या व्यवसायात अडचणी निर्माण झाल्या आहेत. एका व्यावसायिकाला दररोज 2 ते 3 गॅस सिलेंडर लागतात, मात्र तुटवड्यामुळे आता दिवसाला 1 गॅस सिलेंडर मिळणं देखील कठीण झालं आहे. यामुळे वडापाव तयार करणे आणि विकणे दोन्हीच गुंतागुंतीचे झाले आहे. सिलेंडरचा अभाव आणि तेलाच्या वाढत्या किमतींमुळे वडापावची किंमत वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे सध्या सर्वसामान्यांना परवडणारा हा लोकप्रिय स्नॅक भविष्यात महाग होऊ शकतो, अशी माहिती मिळाली आहे.
मी ॲक्सिस बँकेत... नाशिकमधील धर्मांतरण प्रकरणावर अमृता फडणवीस स्पष्ट म
खरातच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू, फॉरेन्सिक
लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल, म्हणाल
Amravati Case | मित्राला मुलींचे घाणेरडे व्हिडीओ पाठवायचा नंतर... आरोप

