Mumbai | सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार
अजित पवार यांच्या निधनाला 15 दिवस पूर्ण होत असताना आज सुनेत्रा पवार अधिकृतपणे उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. आज मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक होणार असून, त्या बैठकीपूर्वी सुनेत्रा पवार मंत्रालयात पदभार स्वीकारतील. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार आणि प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. 28 जानेवारी रोजी अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. बारामती विमानतळाजवळ लँडिंगपूर्वीच त्यांचा विमान कोसळून स्फोट झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले होते आणि पवार कुटुंबावर मोठे दुःख कोसळले. मात्र, वैयक्तिक दुःख बाजूला ठेवत सुनेत्रा पवार यांनी कर्तव्य स्वीकारले. 31 जानेवारी रोजी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. यानंतर राजभवनात राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या निधनाला 15 दिवस पूर्ण होत असताना आज सुनेत्रा पवार अधिकृतपणे उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. आज मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक होणार असून, त्या बैठकीपूर्वी सुनेत्रा पवार मंत्रालयात पदभार स्वीकारतील. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार आणि प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. दरम्यान, हा मोठा पदभार स्वीकारण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत पार्थ पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?

