धीरज परदेशी हत्या प्रकरण: तपासात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा संग्राम जगतापांचा आरोप
धीरजसिंग परदेशी यांच्या प्रकरणात पोलिसांच्या तपासाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत संग्राम जगताप यांनी पत्रकार परिषदेत शासनाकडे विविध मागण्या केल्या. या संपूर्ण प्रकरणासाठी सुरुवातीपासूनच सक्षम विशेष सरकारी वकील नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. घटनेनंतर पोलिसांकडून तपास वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप जगताप यांनी केला. या प्रकरणातील कथित मास्टरमाईंडपर्यंत पोहोचून निष्पक्ष तपास करावा, […]
धीरजसिंग परदेशी यांच्या प्रकरणात पोलिसांच्या तपासाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत संग्राम जगताप यांनी पत्रकार परिषदेत शासनाकडे विविध मागण्या केल्या. या संपूर्ण प्रकरणासाठी सुरुवातीपासूनच सक्षम विशेष सरकारी वकील नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.
घटनेनंतर पोलिसांकडून तपास वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप जगताप यांनी केला. या प्रकरणातील कथित मास्टरमाईंडपर्यंत पोहोचून निष्पक्ष तपास करावा, तसेच आरोपींच्या घरांवर लावलेल्या नोटिसांना मिळालेला स्थगिती आदेश शासनाने कायदेशीर पातळीवर आव्हान द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
धीरजसिंग परदेशी यांच्या पत्नीला शासनाच्या माध्यमातून सन्मानजनक नोकरी देण्यात यावी आणि त्यांच्या कुटुंबाचा योग्य पद्धतीने विचार करण्यात यावा, अशीही मागणी संग्राम जगताप यांनी केली. या सर्व मागण्या घेऊन आपण लवकरच मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले
Published on: Aug 14, 2026 01:45 PM
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...

