शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केलेल्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदेंनीच भाजपला सत्तेत आणले, अन्यथा त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले असते, असे रघुवंशी म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. रघुवंशी यांच्या मते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला (भाजप) जिवंत केले. अन्यथा, भाजपच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असता, असे त्यांचे स्पष्ट मत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजप सत्तेत नव्हता. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून उठाव केल्यानंतरच भाजप पुन्हा सत्तेत आला, असे रघुवंशी यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याने सध्या राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडल्याच्या चर्चा आहेत.
रघुवंशी यांनी पुनरुच्चार केला की, एकनाथ शिंदे यांच्या उठावामुळेच भाजप सत्तेत आला आणि त्यावेळी गावित साहेबांना अनपेक्षितपणे लाभ मिळाला, ते अडीच वर्षे आदिवासी मंत्री राहिले. चंद्रकांत रघुवंशी यांचे हे विधान राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले असून, याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
Published on: Sep 28, 2026 05:31 PM
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...

