AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...

Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या…

| Updated on: Aug 14, 2026 | 2:36 PM
Share

सध्या शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केलं आहे. ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष फोडले गेले, ती प्रक्रिया अयोग्य असून संविधानाच्या चौकटीत बसणारी नाही, असा दावा सुळे यांनी केला. विरोधकांनाही आणि आम्हालाही हे माहिती आहे. ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाचा आणि संबंधित यंत्रणांचा गैरवापर झाला, तो लोकशाहीसाठी घातक असल्याचंही त्यांनी म्हटलं.

शिवसेना पक्षाबाबत बोलताना सुप्रिया सुळे यांनी ठाम भूमिका मांडली. “शिवसेना ही काल, आज आणि उद्या उद्धव ठाकरे यांचीच असणार आहे,” असं त्या म्हणाल्या. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली आणि ते हयात असताना पक्ष उद्धव ठाकरे यांच्या हातात दिला. त्यामुळे शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच असल्याचं सुळे यांनी स्पष्ट केलं. एखाद्याला वेगळं मत असेल, तर त्यांनी राज ठाकरे यांच्याप्रमाणे वेगळी चूल मांडून स्वतःचा पक्ष स्थापन करायला हवा होता, असंही त्या म्हणाल्या. स्वतःच्या कर्तृत्वावर पक्ष उभा करणं ही कौतुकाची गोष्ट असल्याचं त्यांनी नमूद केलं.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वादावरही सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फाउंडर मेंबर असून, पक्षाच्या घटनेमध्ये पक्ष कोणाच्या नेतृत्वाखाली राहील याबाबत स्पष्ट तरतुदी असल्याचा दावा त्यांनी केला. आमदार आणि खासदारांच्या संख्याबळावर पक्षाचा मालकी हक्क ठरत नाही, अशी भूमिका मांडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारांचाच आहे, कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहील, असं सुळे यांनी ठामपणे सांगितलं.

या प्रकरणाशी संबंधित सर्व पुरावे न्यायालयात सादर केल्याचंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. मात्र निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे आपल्यावर अन्याय झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. संस्थांवर टीका करायला आपल्याला आवडत नाही, मात्र जड अंतःकरणाने सांगावं लागतं की, निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसवर चुकीच्या पद्धतीने अन्याय केला, असा आरोप सुळे यांनी केला.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीपासून निवडणूक आयोगाच्या निर्णयापर्यंतच्या मुद्द्यांवर सुप्रिया सुळे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. एकीकडे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाच्या वादावरही न्यायालयीन लढाई सुरू आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकरणांमध्ये न्यायालयाचा अंतिम निर्णय काय असणार, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

Published on: Aug 14, 2026 02:36 PM

Follow Us