AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध गायकाने थेट मंत्र्याचा नंबर केला ब्लॉक; म्हणाला ‘अशा लोकांबद्दल शून्य आदर’, नेमकं काय घडलं?

बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध गायकाने थेट मंत्र्यांना आणि एका नवोदित गायकाला ब्लॉक केलं. याबद्दलची माहिती खुद्द गायकाने सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली. अशा लोकांविषयी माझ्या मनात शून्य आदर असल्याचं त्याने स्पष्ट केलं.

प्रसिद्ध गायकाने थेट मंत्र्याचा नंबर केला ब्लॉक; म्हणाला 'अशा लोकांबद्दल शून्य आदर', नेमकं काय घडलं?
Vishal DadlaniImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 10, 2026 | 11:34 AM
Share

प्रसिद्ध गायक आणि संगीतकार विशाल ददलानी हा अशा मोजक्या लोकांपैकी एक आहे, जे कोणत्याही मुद्द्यावर बेधडकपणे बोलण्यास कधीच कचरत नाहीत. सरकारविरोधात आवाज उठवण्यापासून ते घराणेशाहीपर्यंत.. विशाल ददलानी बिनधास्तपणे त्याची मोकळी मतं मांडत असतो. आता पुन्हा एकदा तो त्याच्या अशाच अंदाजासाठी चर्चेत आला आहे. यावेळी त्याने म्युझिक इंडस्ट्रीतील ‘शिफारशीच्या कल्चर’वर परखडपणे भाष्य केलं आहे. विशालने स्पष्ट शब्दांत सांगितलं की प्रतिभेशिवाय शिफारशीच्या जोरावर काम मिळवणाऱ्यांसाठी त्याच्याकडे अजिबात वेळ नाही. सोमवारी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित विशालने नवोदित गायकांना मोलाचा सल्ला दिला आहे.

विशालने त्याच्या पोस्टमध्ये उघड केलं की त्याने नुकतंच एका मंत्र्यांना आणि नवोदित गायकाला ब्लॉक केलं आहे. कारण राजकीय प्रभावाचा वापर करून संबंधित गायकाने काम मिळवण्याचा प्रयत्न केला होता. ‘कृपया तुमच्या प्रतिभेवर विश्वास ठेवा, कठोर मेहनत करण्यासाठी तयार राहा आणि संयम ठेवा. जर तुम्ही चांगले असाल तर तुमची वेळ निश्चितच येईल. पण कृपया शिफारशीसारख्या गोष्टी करू नका. ही अत्यंत कंटाळवाणी आणि परिणामशून्य बाब आहे. त्याहीपेक्षा अधिक यातून असं दिसून येतं की तुम्हाला तुमच्याच प्रतिभेवर फारसा विश्वास नाही, असं कॅप्शनमध्ये लिहित विशालने ही पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by VISHAL (@vishaldadlani)

‘नवोदित गायकांना सल्ला.. कुठल्याही मंत्र्याला किंवा त्यांच्या सचिवांना मला कॉल करायला लावू नका. असं केल्याने तुम्ही कधीच मला भेटू शकणार नाही. जे लोक संपर्कांचा फायदा घेऊन पुढे येण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्याविषयी माझ्या मनात शून्य आदर आहे. ज्याने असं करण्याचा प्रयत्न केला त्याला आणि संबंधित मंत्र्यांनाही मी ब्लॉक केलं आहे. त्यामुळे आता जरी तुम्ही चांगले गायक असलात तरी मला तुमच्यासोबत काम करण्यात काडीचा रस नाही. माफ करा’, अशा शब्दांत त्याने पोलखोल करत सुनावलं आहे.

विशालच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव  केला आहे. तू केवळ संगीत क्षेत्रातच नाही तर ज्या पद्धतीने प्रामाणिकपणे जीवन जगायला शिकवतोस त्यासाठीही तू अनेकांचं प्रेरणास्थान आहेस, असं एकाने लिहिलं. ‘हीच योग्य पद्धत आहे, अशा लोकांना धडा शिकवण्याची’, असं दुसऱ्याने म्हटलं आहे.

Follow Us
महाराष्ट्रात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी
महाराष्ट्रात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी.
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं.
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय.
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी.
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?.
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत...
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत....
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?.
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव.
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज.
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच....
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच.....