Anjali Damania On Ashok Kharat |अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; शिजूका नॉडी नावाने असंख्य कॉल्स, बड्या लोकांच्या सहभागाचा संशय
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत असून संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. 18 मार्च रोजी अटक झालेल्या खरातच्या एसआयटी चौकशीतून अनेक गंभीर बाबी उघड होत आहेत. तपासादरम्यान खरातने स्वतःबाबत धक्कादायक वक्तव्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. “माझं मरण इथेच आहे,” असे त्याने म्हटल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्याच्या सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत.
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत असून संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. 18 मार्च रोजी अटक झालेल्या खरातच्या एसआयटी चौकशीतून अनेक गंभीर बाबी उघड होत आहेत. श्रद्धेचा गैरवापर करत त्याने असंख्य महिलांना फसवून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. महिलांना कार्यालयात बोलावून वर्षानुवर्षे शोषण करण्यात आले असून त्याचे व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाल्याची माहिती समोर आली आहे.
तपासादरम्यान खरातने स्वतःबाबत धक्कादायक वक्तव्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. “माझं मरण इथेच आहे,” असे त्याने म्हटल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्याच्या सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. “शिजूका नॉडी” या नावाने अनेक कॉल्स झाल्याचा दावा करत, या प्रकरणामागे मोठ्या व्यक्तींचा सहभाग असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. तसेच रुपाली चाकणकर यांचे खरातशी 177 कॉल्स असल्याचा पुनरुच्चार करत, त्यांना अद्याप समन्स का देण्यात आले नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; शिजूका नॉडी नावाने असंख्य कॉल्स
'वारकरी संप्रदायात 60 % लोकांच्या...' शरद पवारांच्या भाष्यावरुन राजकीय
सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका? बीडमधील पत्रामुळे खळबळ
ऑपरेशन टायगर चर्चेनंतर, सावंत-ठाकरे यांची मातोश्रीवर महत्त्वपूर्ण बैठक

