अंजली दमानिया
अंजली दमानिया या महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी अनेक भ्रष्टाचार विरोधी आंदोलनं केली आहे. तसंच मोठ्या नेत्यांचे घोटाळे देखील उघडकीस आणले आहेत. बीडचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या भोसले या दोन्ही प्रकरणात दमानिया यांनी केलेल्या मोठ्या खुलाशांमुळे त्या प्रकाशझोतात आल्या.
Anjali Damania : पार्थ पवार काही छोटं बाळ… मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची दादांवर टीका
मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अजित पवारांनी पार्थ पवारांची पाठराखण करत अधिकाऱ्यांना दोष दिला. यावर अंजली दमानिया यांनी तीव्र टीका केली. पार्थ पवार काही छोटं बाळ नाही, हा व्यवहार फसवणूक आहे, चूक नाही, असे दमानिया म्हणाल्या. अधिकाऱ्यांना बळीचा बकरा बनवू नये आणि या प्रकरणात हायकोर्टानेही पार्थ पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, असे त्यांनी नमूद केले.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 13, 2025
- 5:51 pm
Anjali Damania : हिवाळी अधिवेशन सुरूये की फॅशन शो… दमानियांचा संताप अन् सरकारच्या कार्यपद्धतीवर सवाल
अंजली दमानिया यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अधिवेशनाचा खर्च प्रतिदिन १२.८ कोटी रुपये असूनही गंभीर विषयांवर चर्चा होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सरकारी जमिनींवरील श्वेतपत्रिका आणि महसूल व पोलीस विभागाकडून इशारा पत्राची मागणी त्यांनी केली आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 12, 2025
- 2:03 pm
Nilesh Magar : दमानियांचे ते आरोप खोटे? ‘त्या’ व्यवहाराशी माझा संबध नाही, 2004 मध्ये मी उपमहापौर अन् 2018… निलेश मगर स्पष्टच म्हणाले…
अंजली दमानिया यांनी केलेल्या जमीन गैरव्यवहाराच्या आरोपांना निलेश मगर यांनी फेटाळून लावले आहे. ते म्हणाले की, मी 2004 साली उपमहापौर होतो, तर हा व्यवहार 2018 मधील आहे. त्यांनी संरक्षित कुळांच्या मदतीसाठी पॉवर ऑफ ॲटर्नी घेतल्याचे स्पष्ट केले, परंतु जमीन सरकारी असल्याचे कळताच थांबलो, असे मगर यांनी सांगितले.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 10, 2025
- 1:21 pm
Anjali Damania : …म्हणून अजित पवारांची हिंमत, तेव्हा त्यांची सत्ता नव्हती, पण आता तर… दमानियांच्या दाव्यानं एकच खळबळ
अंजली दमानिया यांनी पुण्यातील एका जमीन घोटाळ्याप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. उपमहापौर निलेश मगर यांच्या माध्यमातून अजित पवारांच्या पक्षाने 2018 पासून एका जमिनीवर नजर ठेवली होती, असे दमानिया म्हणाल्या. सत्तेत आल्यानंतर ही जमीन थेट पार्थ पवार यांच्या कंपनीच्या नावावर घेण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे. यासंदर्भातील पुरावे खारगे समितीकडे सादर केले आहेत.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 10, 2025
- 12:08 pm
NCP Ajit Pawar : अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण? थेट माजी मंत्र्याचा सवाल करत गंभीर आरोप
अनिल पाटील यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या दमानिया कुणाच्यातरी सांगण्यावरून काम करत असून, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याची सुपारी दिली असल्याचा दावा पाटील यांनी केला
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 8, 2025
- 5:41 pm
Anjali Damania : पार्थ पवार यांचं नाव FIR मध्ये आलं तर अजित पवार यांना… अंजली दमानिया दादांच्या राजीनाम्यावर ठाम, प्रकरण काय?
अंजली दमानिया यांनी पार्थ पवार आणि अमेडिया एंटरप्रायजेस एलएलपीचे नाव एफआयआरमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली आहे, ज्यामुळे अजित पवारांच्या राजीनाम्याची नैतिक जबाबदारी निर्माण होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. दिग्विजय पाटील यांना परदेश प्रवासाची परवानगी देणे आणि शीतल तेजवानी यांच्या अटकेसंदर्भातही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 4, 2025
- 1:17 pm
Anjali Damania : पुणे जमीन घोटाळा प्रकरणी शीतल तेजवानीच्या अटकेनंतर अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया, पहिला आरोपी म्हणजे…
पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीला अटक झाली असली तरी, अंजली दमानिया यांनी याला थोड्याफार कारवाईचे प्रदर्शन म्हटले आहे. अमेडिया एंटरप्रायजेस एलएलपी, पार्थ पवार, दिग्विजय पाटील, कलेक्टर डुडी आणि अजित पवार यांच्यावर कारवाईची मागणी करत त्यांनी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 3, 2025
- 9:37 pm
Anjali Damania : अंजली दमानिया दिल्लीत, भाजपच्या या बड्या नेत्याच्या भेटीची वेळ मागितली, कुठल्या तीन मागण्या मांडणार?
Anjali Damania : पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यातील महार वतनाची 1800 कोटी रुपयांची जमीन अवघ्या 300 कोटी रुपयांत खरेदी केल्याचा आरोप झाला. हे प्रकरण समोर आल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली होती.
- Dinananth Parab
- Updated on: Nov 28, 2025
- 11:01 am
Anjali Damania: आता माघार नाही, अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादीचं चॅलेंज स्वीकारलं,पुणे जमीन घोटाळाप्रकरणात हायकोर्टात जाणार?
Anjali Damania on Pune Land Scam: मुंढवा जमीन घोटाळ्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत. याप्रकरणात पार्थ पवार यांच्या कंपनी अमेडियाला मुद्रांक शुल्क भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. तर त्याचवेळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा इशारा दिला आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 27, 2025
- 11:25 am
Anjali Damania: पुणे जमीन घोटाळा प्रकरण थेट दिल्लीत? अजित दादांचं नाव घेत… मोठी अपडेट समोर
अंजली दमानिया यांनी 40 एकर सरकारी जमीन, अंदाजे 1800 कोटी रुपयांची, अमेडिया कंपनीने केवळ 500 रुपयांत हडपल्याचा आरोप केला आहे. डेटा सेंटरच्या नावाखाली स्टॅम्प ड्युटी सवलत मिळवून हा मोठा घोटाळा झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दमानिया यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची 24 तासांत मागणी केली असून, राजीनामा न झाल्यास अमित शहांना भेटणार असल्याचे सांगितले आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Nov 26, 2025
- 4:21 pm
Anjali Damania : थर्ड क्लास व्यक्ती.. धनंजय मुंडेंच्या वाल्मिक कराडबाबतच्या वक्तव्यावरून दमानियांचा संताप
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पार्थ पवार यांच्या मुंडवा जमीन घोटाळ्यातील एफआयआर नसल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी गौरी पालवे आत्महत्या प्रकरणातील तपासात राजकारण न आणण्याचे आवाहन केले. तसेच, धनंजय मुंडे यांच्या वाल्मिक कराड यांच्यावरील विधानाला थर्ड क्लास संबोधत, अजित पवार आणि रुपाली चाकणकर यांच्या निवडणूक निधीसंदर्भातील वक्तव्यांवरही टीका केली.
- Harshada Shinkar
- Updated on: Nov 25, 2025
- 4:43 pm
Anjali Damania: ‘हा थर्ड क्लास माणूस’, अंजली दमानिया राष्ट्रवादीच्या या नेत्यावर संतापल्या, का केला इतका उद्धार
Anjali Damania Furious over NCP Leader: राज्यात अनेक घोटाळे समोर येत आहेत. अनेक ठिकाणी राजकीय दबावतंत्राचा वापर सुरू असल्याचा आरोप होत आहे. त्यातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नेत्यावर जहरी टीका केली आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 25, 2025
- 3:00 pm