AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut | विमान अपघातावरून राजकारण तापले; तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

Sanjay Raut | विमान अपघातावरून राजकारण तापले; तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

| Updated on: Feb 12, 2026 | 11:01 AM
Share

शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यापासून राज्यातील आणि देशातील तपास यंत्रणा लाचार व गुलाम झाल्या आहेत, असा आरोप राऊत यांनी केला. ED, CBI, महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणा तसेच न्यायालयीन चौकशी यांवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही, असे ते म्हणाले.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातामागील संशय अद्याप कायम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आमदार रोहित पवार यांनी गेल्या दोन दिवसांत या प्रकरणातील विविध मुद्द्यांवर भाष्य करत हा अपघात नसून घातपात असू शकतो, असा संशय व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी या प्रकरणातील तपास यंत्रणांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यापासून राज्यातील आणि देशातील तपास यंत्रणा लाचार व गुलाम झाल्या आहेत, असा आरोप राऊत यांनी केला. ED, CBI, महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणा तसेच न्यायालयीन चौकशी यांवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही, असे ते म्हणाले.

राऊत यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधताना गंभीर आरोप केले. “जे सरकार आपल्या स्वार्थासाठी प्रेसिडेंट ट्रम्प यांच्या पायाशी भारतमाता गहाण ठेवू शकते, ते सरकार काहीही करू शकते,” असे वक्तव्य त्यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून कोणत्याही घटनेचा तपास निष्पक्ष झालेला नाही, उलट तो पक्षपातीच झाला आहे, असा आरोपही त्यांनी केला. भाजप नेत्यांना सातत्याने क्लीनचिट देण्यात येत असल्याचेही राऊत म्हणाले. घात, अपघात आणि इतर अनेक घटनांमध्ये तपास यंत्रणांनी प्रभावीपणे काम केले नसल्याचा दावा करत राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावरही प्रतिक्रिया दिली. “तपास यंत्रणांवर विश्वास ठेवा, असे फडणवीस म्हणतात. पण तुमच्या सरकारवरच विश्वास नाही, तर तपास यंत्रणांवर कसा ठेवायचा?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Published on: Feb 12, 2026 11:01 AM