‘मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे’, रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे असं एकनाथ शिंदेनी म्हटलंय. रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मी देखील रिक्षा चालवली त्यांचा मला अभिमान आहे असं देखील एकनाथ शिंदेनी म्हटलंय. तसंच मराठीचा आग्रह हा माणसं जोडण्यासाठी आहे. मराठी लोकांशी मराठीत संवाद साधणं ही मराठी माणसाची जबाबदारी आहे असं देखील शिंदेनी म्हटलंय. अनेक जण याला […]
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे असं एकनाथ शिंदेनी म्हटलंय. रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मी देखील रिक्षा चालवली त्यांचा मला अभिमान आहे असं देखील एकनाथ शिंदेनी म्हटलंय. तसंच मराठीचा आग्रह हा माणसं जोडण्यासाठी आहे. मराठी लोकांशी मराठीत संवाद साधणं ही मराठी माणसाची जबाबदारी आहे असं देखील शिंदेनी म्हटलंय.
अनेक जण याला मराठीची सक्ती म्हणतात पण ही मराठीची सक्ती नाही तर मराठीची भक्ती आहे. मगाशी उदय सामंत म्हणाले, रिक्षा चालक, रिक्षा मी देखील कधी काळी रिक्षा चालवली याचा मला अभिमान आहे. आणि त्याचा फायदा मला राजकारणात झाला, तीन पक्षाचं सरकार चालवायला. ही योजना राज्यातल्या पहिल्या पाच सर्वात महत्त्वाच्या योजनांपैकी एक आहे. जगभरामध्ये आपली मराठी माणसं आहेत आणि म्हणून आपल्या मराठी भाषेची एक अस्मिता आहे. आपल्याला मराठीचा आग्रह कशासाठी आहे? मराठीचा आग्रह हा माणसं जोडण्यासाठी आहे. मराठी भाषा शिकणं ही जशी अमराठी भाषकांसाठी जबाबदारी आहे तशी त्यांच्याशी मराठीत संवाद साधणं ही मराठी लोकांची देखील म्हणजे प्रवाशांची देखील जबाबदारी आहे. असं शिंदे म्हणाले.

