Supriya Sule | एका डोळ्यात आनंद आणि एका डोळ्यात अश्रू; सुप्रिया सुळे दादांच्या आठवणींनी झाल्या भावूक
गेल्या दोन तीन दिवसांपासून ज्येष्ठ नेते शरद पवार पुण्यातील रुबी क्लिनिकमध्ये उपचार घेत आहेत. पवार यांच्या प्रकृतीबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली. सर्व डॉक्टर, हेल्थ वर्कर्स आणि तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे पवारसाहेबांची तब्येत आता खूप सुधारली आहे. रुबी हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे मी मनापासून आभार मानते. पवारसाहेबांचा पाच दिवसांचा अँटीबायोटिक्सचा कोर्स सुरू आहे आणि त्यांना शुक्रवारी डिस्चार्ज मिळणार आहे.
गेल्या दोन तीन दिवसांपासून ज्येष्ठ नेते शरद पवार पुण्यातील रुबी क्लिनिकमध्ये उपचार घेत आहेत. पवार यांच्या प्रकृतीबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली. सर्व डॉक्टर, हेल्थ वर्कर्स आणि तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे पवारसाहेबांची तब्येत आता खूप सुधारली आहे. रुबी हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे मी मनापासून आभार मानते. पवारसाहेबांचा पाच दिवसांचा अँटीबायोटिक्सचा कोर्स सुरू आहे आणि त्यांना शुक्रवारी डिस्चार्ज मिळणार आहे, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यावरही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “वहिनींवर आता मोठी जबाबदारी आली आहे. त्यामुळे एका डोळ्यात आनंद आहे, तर दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहेत.” वहिनी उपमुख्यमंत्री झाल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले, पण दादा आपल्यात नसल्याचे दुःख कायम राहील, असेही त्यांनी नमूद केले. त्या पुढे म्हणाल्या, “दादा नसल्याचं दुःख आयुष्यभर राहील. ही प्रेमाची नाती असतात. वेळ जरी पुढे जात असली तरी ही पोकळी भरून निघत नाही. सुप्रिया सुळे ” भावनिक होत त्या म्हणाल्या, “आमच्या सर्व भावंडांचे दादासोबत खूप जिव्हाळ्याचे नाते होते. इतक्या लहान वयात दादा आपल्याला सोडून गेले, हे मान्य करणे कठीण आहे. त्यांनी कधीही थकलेले किंवा आजारी असल्याचे दाखवले नाही. आज ते आपल्यात नाहीत, यावर अजूनही विश्वास बसत नाही.”
Published on: Feb 12, 2026 12:51 PM
थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान
पावसाचा कहर! पहिल्या आठवड्यातच झाले नागरिकांचे हाल! प्रभादेवी रेल्वे
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा

