Sanjay Raut Uncut PC | नार्वेकरांना अधिकार देणं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेची धुरा डाकू मानसिंगकडे देणं; राऊतांचा हल्लाबोल
लोकसभा अध्यक्षांनी विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषदेच्या सभापतींचे अधिकार निश्चित करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी भाजप नेते आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयावरून राज्याच्या राजकारणात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत जोरदार टीका केली आहे. राहुल नार्वेकर यांच्या नियुक्तीवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ज्यांनी आपल्या अधिकारांच्या मर्यादा ओलांडून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीला मान्यता दिली, अशा व्यक्तीकडे ही जबाबदारी देणे म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेची धुरा डाकू मानसिंगकडे देण्यासारखे आहे. कायद्याच्या अक्षरशः धज्ज्या उडवणाऱ्या व्यक्तीकडे अधिकार निश्चित करण्याची जबाबदारी दिली जात आहे, असं देखील राऊत म्हणाले. तसेच, केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करताना संजय राऊत यांनी “सबका विकास, सबका सत्यानाश” असा टोला लगावत भाजपवर निशाणा साधला.
Published on: Feb 10, 2026 11:52 AM
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?